Yashasvi Jaiswal, Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, याआधी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
पण युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित आहे. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वाल याची निवड का करावी? असेही प्रश्न निर्माण होत आहेत.
आतापर्यंत यशस्वी जैस्वाल याला भारताकडून एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण या फलंदाजाने लिस्ट ए सामन्यांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यशस्वी जैस्वालने ३२ लिस्ट ए सामन्यात १५११ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये या खेळाडूने ५ शतके झळकावली आहेत. याशिवाय ७ अर्धशतके केली आहेत.
सध्या यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममधून जात आहे. अलीकडेच यशस्वी जयस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या होत्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा यशस्वी जैस्वाल होत्या. या फलंदाजाने ४३.४४ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या होत्या. या मालिकेत यशस्वी जैस्वालने एक शतक झळकावण्याव्यतिरिक्त दोनदा पन्नास धावांचा टप्पा पार केला होता.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात असणार आहेत. त्याचबरोबर जैस्वालची बॅकअप ओपनर म्हणून निवड होऊ शकते. पण जर तो गिलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये आला तर सलामीच्या जोडीत चांगले लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन होऊ शकते. अशा परिस्थितती आता यशस्वी जैस्वालच्या निवडीबाबत बीसीसीआयची निवड समिती काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे..
संबंधित बातम्या