भारतीय संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळणार आहेत.
दोन्ही संघातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांना जागा मिळाली नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक झळकावले असले तरी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मात्र बांगलादेशविरुद्धच्या मालिकेकडे दुर्लक्ष करण्यात आले.
वास्तविक, सरफराज खान आणि केएल राहुल यांच्या उत्कृष्ट फॉर्मचा फटका श्रेयस अय्यरला बसल्याचे मानले जात आहे. सरफराज खान आणि केएल राहुल सातत्याने चांगली फलंदाजी करत आहेत. यामुळे श्रेयस अय्यरचा पत्ता कटल्याचे सांगितले जात आहे. टीम इंडियामध्ये सध्या मधल्या फळीत खूप स्पर्धा आहे.
याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेत सहभागी होणार नाही. अलीकडेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संकेत दिले होते की मोहम्मद शमी बांगलादेश मालिकेतून पुनरागमन करू शकतो, परंतु आता मोठी माहिती समोर येत आहे. मोहम्मद शमी या मालिकेत खेळणार नाही. मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे बोलले जात आहे.
सध्या मोहम्मद शमी त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. मात्र, मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
पहिला कसोटी सामना - १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई
दुसरा कसोटी सामना - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर
पहिला T20 सामना - ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, धर्मशाला
दुसरा T20 सामना - ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, दिल्ली
तिसरा T20 सामना - १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, हैदराबाद