India Asia Cup Squad : केएल राहुल पूर्णपणे फिट नाही? संजू सॅमसन राखीव खेळाडू म्हणून संघात
kl rahul fitness : आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी केएल राहुलच्या फिटनेसबद्दल सांगितले की तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
आशिया कप 2023 साठी भारताचा १७ सदस्यीय संघ अखेर जाहीर झाला आहे. संघाची घोषणा करण्यासोबतच टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी केएल राहुलच्या फिटनेसबाबत धक्कादायक विधान केले आणि संजू सॅमसनचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्याच्या निर्णयाबाबतही सांगितले आहे. आशिया कप संघात श्रेयस अय्यर आणि राहुल या दोघांचे पुनरागमन झाले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना आणि केएल राहुलच्या फिटनेसबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की तो अजूनही थोडासा अडचणीत आहे पण त्याचा त्याच्या दुखापतीशी संबंध नाही. राहुलची ही एक वेगळीच दुखापत आहे. अशा परिस्थितीत आम्ही बॅकअप खेळाडू म्हणून संजू सॅमसनचा संघात समावेश केला आहे.
आगरकरने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राहुलला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आशिया चषकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत वेळ लागेल. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही संजू सॅमसनचा बॅकअप खेळाडू म्हणून संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्याच्या फिटनेसची संपूर्ण माहिती लवकरच देऊ.
श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त
आशिया चषक संघात पुनरागमन केलेल्या श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, तो पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, राहुल आणि श्रेयस हे दोन्ही खेळाडू बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. तर, राहुलशिवाय इशान किशनलाही यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन(रिजर्व)