विनोद कांबळीच्या वाईट अवस्थेवरून सचिनला शिव्या का? कपिल देव यांनी नेटकऱ्यांना खडसावलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विनोद कांबळीच्या वाईट अवस्थेवरून सचिनला शिव्या का? कपिल देव यांनी नेटकऱ्यांना खडसावलं

विनोद कांबळीच्या वाईट अवस्थेवरून सचिनला शिव्या का? कपिल देव यांनी नेटकऱ्यांना खडसावलं

Dec 10, 2024 12:57 PM IST

Vinod Kambli News : विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कांबळीने १७ कसोट आणि १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

विनोद कांबळीच्या वाईट अवस्थेवरून सचिनला शिव्या का? कपिल देव यांनी नेटकऱ्यांना खडसावलं
विनोद कांबळीच्या वाईट अवस्थेवरून सचिनला शिव्या का? कपिल देव यांनी नेटकऱ्यांना खडसावलं

दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कांबळीला सध्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याच्या समस्या आहेत. 

अलीकडेच, दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, विनोद कांबळी अतिशय बिकट अवस्थेत दिसला. तो त्याचा बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरचा हात धरून त्याच्याशी बोलतानाही दिसला.

या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कपिल यांनी कांबळीच्या प्रकृतीबद्दल दु:ख व्यक्त केले. कपिल म्हणाले, ‘आपण सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याला आपल्यापेक्षा स्वतःला जास्त आधार द्यावा लागेल. जर एखादी व्यक्ती स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल तर आपण अशा लोकांची काळजी घेऊ शकत नाही.'

या दरम्यानच, अनेक लोक सोशल मीडियावर विनोद कांबळीचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करून  सचिन तेंडुलकरला खलनायक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अशा लोकांना कपिल देव यांनी खडसावले आहे.

ते म्हणाले, की ‘आपण जे काही पाहिलं त्यामुळे सर्व क्रिकेटपटू खूप दु:खी झाले आहेत. त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला काही मदत करावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तो स्वतःची काळजी घेऊ शकेल आणि परत रिहॅबमध्ये जाऊ शकेल. लोकांना हा आजार होतो पण त्यांना पुन्हा रिहॅबमध्ये जावे लागते.’

विनोद कांबळी यांना ड्रग्जचे व्यसन 

कांबळीने गेल्या काही वर्षांत आरोग्याच्या अनेक आव्हानांचा सामना केला आहे. २०१२ मध्ये त्याची 'अँजिओप्लास्टी' करावी लागली. यानंतर २०१३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला. दारूच्या व्यसनाशी झुंज देत, त्याला अनेक वेळा पुनर्वसनात जावे लागले. याचा त्याच्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला.

कांबळीने भारतासाठी १०४ वनडे आणि १७ कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे २४७७ आणि १०८४ धावा केल्या आहेत. कांबळीने शालेय स्तरावर सचिनसोबत ६६४ धावांची ऐतिहासिक अखंड भागीदारी केली होती. हीच भागीदारी आणि त्याच्या ३०० हून अधिक धावांच्या खेळीमुळे तो आणि सचिन प्रसिद्ध झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या