मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 'आऊट', मग रोहित शर्मा दुसऱ्यांदा फलंदाजीला कसा आला? नियम काय? पाहा

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 'आऊट', मग रोहित शर्मा दुसऱ्यांदा फलंदाजीला कसा आला? नियम काय? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2024 11:55 AM IST

Rohit Sharma Vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील शेवटच्या टी-20 सामन्याचा निकाल ४४ व्या षटकात आला. मात्र यावरूनही आता वाद निर्माण झाला आहे. पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूआधी रोहित शर्मा रिटायययर होऊन मैदानाबाहेर गेला.

Bengaluru: India's captain Rohit Sharma and Rinku Singh run between the wickets during the third T20 cricket match between India and Afghanistan, at M Chinnaswamy Stadium, in Bengaluru, Wednesday, Jan. 17, 2024. (PTI Photo/Shailendra Bhojak) (PTI01_17_2024_000512A)
Bengaluru: India's captain Rohit Sharma and Rinku Singh run between the wickets during the third T20 cricket match between India and Afghanistan, at M Chinnaswamy Stadium, in Bengaluru, Wednesday, Jan. 17, 2024. (PTI Photo/Shailendra Bhojak) (PTI01_17_2024_000512A) (PTI)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील शेवटचा टी-20 सामना (१७ जानेवारी) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना खूपच रोमहर्षक झाला. 

सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावत २१२ धावा केल्या. यानंतर अफगाण संघानेही ६ गडी गमावून २१२ धावा केल्या, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

यानंतर सुपर ओव्हर खेळली. ही सुपर ओव्हरदेखील टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या. 

यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ५ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडे गोलंदाजी सोपवली.

बिश्नोईने आपल्या फिरकीची जादू दाखवत केवळ १ रन दिला आणि अफगाणिस्तानचे दोन्ही फलंदाज बाद केले. बिश्नोईने मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांना झेलबाद केले.

रोहितच्या फलंदाजीस येण्यावरून वाद 

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील शेवटच्या टी-20 सामन्याचा निकाल ४४ व्या षटकात आला. मात्र यावरूनही आता वाद निर्माण झाला आहे. पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूआधी रोहित शर्मा रिटायययर होऊन मैदानाबाहेर गेला. पण दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो परत बॅटिंगला आला. पण सुपर ओव्हरमध्ये कोणताही फलंदाज बाद झाल्यानंतर खेळू शकत नाही.

आयसीसीचे नियम काय सांगतात?

बाद न होत मैदान सोडण्याबाबतचा आयसीसीचा नियम काय सांगतो? 

नियम २५.४.२ नुसार जर एखादा फलंदाज दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे रिटायर होत असेल तर तो फलंदाज आपला डाव पुन्हा सुरू करण्याचा हक्कदार आहे. म्हणजेच तो पुन्हा फलंदाजीस येऊ शकतो. 

पण जर काही कारणास्तव तो फलंदाज त्या सामन्यात पुन्हा फलंदाजीस येऊ शकला नाही तर त्या फलंदाजाची नोंद 'रिटायर्ड - नॉट आउट' म्हणून केली जाते.

पुढील नियम २५.४.३ मध्ये अशी तरतूद आहे, की जर एखादा फलंदाज २५.४.२ व्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव रिटायर झाला तर तो फलंदाज केवळ विरोधी संघाच्या कर्णधाराच्या संमतीनेच फलंदाजीस येऊ शकतो. 

पण जर तो फलंदाजी येऊ शकला नाही तर त्याची नोंद रिटायर्ड - आऊट णून केली जाईल.

अफगाण कर्णधाराला विचारले होते का?

नियमानुसार दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित पुन्हा फलंदाजीला आला. पण त्याआधी अफगाणिस्तानचा कर्णधार  इब्राहिम झाद्रानची संमती घ्यायला हवी होती. पण कोच जोनाथन ट्रॉटने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जे सांगितले त्या आधारे संघांमध्ये कोणतीही स्पष्टता नव्हती. 

जेव्हा ट्रॉटला विचारण्यात आले की अधिकाऱ्यांनी परिस्थितीबाबत त्यांच्याशी सल्लामसलत केली होती का? तेव्हा तो म्हणाला, 'मला काहीच माहिती नाही.'

रोहित रिटायर्ड नॉट आउट ठरला

पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपूर्वी रोहित शर्माने पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या नियमानुसार तो रिटायर्ड नॉट आउट झाला. म्हणजेच तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. 

मात्र याबाबत इब्राहिम झद्रान याची परवानगी घेण्यात आली होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ११ धावा केल्या आणि या सर्व धावा रोहितच्या बॅटमधून आल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही त्याने १३ धावांचे योगदान दिले होते.

WhatsApp channel