आयपीएल मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला रीलीज केले. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला का सोडले? यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र आता या प्रकरणाशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत का वेगळे झाले, हे आता एका ताज्या माहितीतून समोर आले आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या नवीन कोचिंग स्टाफवर खूश नव्हता. अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सने माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. तर वेणुगोपाल राव यांना दिल्ली कॅपिटल्स क्रिकेटचे संचालक केले.
पीटीआयच्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे, की ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या नवीन कोचिंग स्टाफवर नाराज होता, त्यानंतर त्याने मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत पैशाऐवजी दिल्ली कॅपिटल्सच्या रणनीतीवर खूश नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
याशिवाय हेमांग बदानी यांची मुख्य प्रशिक्षकपदी आणि वेणुगोपाल राव यांची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाने ऋषभ पंत नाराज झाला. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोघांमध्ये काही जमले नाही. आता ऋषभ पंत मेगा लिलावाचा भाग असेल. मेगा लिलावात ऋषभ पंतवर पैशांचा पाऊस पडू शकतो, असे मानले जात आहे.
ऋषभ पंत आयपीएल २०१६ च्या मोसमात पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. यानंतर, तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत राहिला, परंतु यावेळी मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार रिटेन न करण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल २०२४ पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग होते, परंतु आता त्यांनी पंजाब किंग्जसोबत करार केला आहे. पंजाब किंग्जने रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगच्या जागी हेमांग बदानी यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. तर वेणुगोपाल राव यांना क्रिकेट संचालक करण्यात आले. याआधी सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक होते.