भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा समित याची टीम इंडियाच्या अंडर-१९ संघात निवड झाली आहे. समित भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. समितची अलीकडची कामगिरी लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे.
समितने या वर्षाच्या सुरुवातीला कूचबिहार ट्रॉफीमध्ये कर्नाटकसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. समितची भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली असली तरी तो विश्वचषक खेळू शकणार नाही.
वास्तविक, आगामी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ मध्ये खेळला जाणार आहे. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समितचा जन्म १० नोव्हेंबर २००५ रोजी झाला आणि तो आपला १९ वा वाढदिवस साजरा करण्यापासून फक्त २ महिने दूर आहे.
याचा अर्थ बीसीसीआयने २०२६ च्या विश्वचषकासाठी अंडर-१९ संघाची निवड करेल, तेव्हा समितचे वय २१ वर्षे असेल आणि त्यामुळे तो अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळू शकणार नाही.
समित द्रविड सध्या कर्नाटकात महाराजा T20 ट्रॉफी खेळत आहे. तो म्हैसूर वॉरियर्स संघाचा भाग आहे आणि त्याने ७ डावात ११४ च्या स्ट्राइक रेटने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ८२ धावा केल्या आहेत.
यावर्षी खेळल्या गेलेल्या कूचबिहार ट्रॉफीमुळे समित प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या स्पर्धेत समितने कर्नाटकसाठी केवळ ८ सामन्यांत ३६२ धावा केल्या होत्या आणि १६ बळी घेतले होते. यामुळेच समितला एक दमदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ - रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) , समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत आणि मोहम्मद अनन.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ – वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशी सिंग पंगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग आणि मोहम्मद अनन.