सर्वच आयपीएल संघांनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) आपापली रिटेन्शन यादी जाहीर केली. रिटेन्शनमधील सर्वात धक्कादायक निर्णय गेल्या हंगामातील (IPL 2024) चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) घेतला. तो म्हणजे, केकेआरने चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यर याला रिटेन केले नाही. श्रेयस अय्यर आता ऑक्शनमध्ये उतरणार आहे.
केकेआरच्या या धक्कादायक निर्णयानंतर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने असे का केले? असे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. अशातच आता टीमचे सीईओ वेंकी मैसूर यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
व्येंकी मैसूर यांनी RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत कर्णधार श्रेयस अय्यरला का रीलीज केले हे उघड केले आहे. फ्रँचायझीच्या सीईओंनी सांगितले की, श्रेयस अय्यरला रीलीज करण्यात पैशांसह अनेक घटक होते.
सोबतच, कोणत्याही खेळाडूची खरी किंमत लिलावातच कळते, असेही त्यांनी नमूद केले. व्येंकी मैसून यांनी सांगितले. मैसूर यांच्या या शब्दांवरून हे स्पष्ट झाले की श्रेयस अय्यरला पैशांमुळे रिटेन करण्यात आले नाही.
इतकंच नाही तर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की, अय्यरने IPL २०२५ पूर्वी रिटेन होण्यासाठी KKR कडे खूप पैशांची मागणी केली होती.
केकेआरच्या रिटेन्शन यादीत श्रेयस अय्यर हाच पहिल्या क्रमांकावर होता, असेही व्येंकी मैसूर यांनी स्पष्ट केले आहे. परंतु विविध कारणांमुळे अय्यर संघात राहू शकला नाही.
व्येंकी म्हैसूर म्हणाले, “तो आमच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता कारण तो कर्णधार आहे आणि आम्हाला नेतृत्वाभोवती सर्व काही तयार करायचे आहे आणि आम्ही २०२२ मध्ये त्याची निवड केली होती. दुर्दैवाने, २०२३ मध्ये तो जखमी झाला होता. तो परत आला आम्ही त्याला पुन्हा कर्णधारपद दिले. कारण तो जेव्हा येईल, तेव्हा कर्णधारपद त्याचेच राहिल, असे आम्ही स्पष्ट केले होते. म्हणूनच तो अविभाज्य घटक राहिला. “त्याने एक अद्भुत काम केले.”
श्रेयस अय्यरने २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर तो २०२१ पर्यंत दिल्लीचा भाग राहिला आणि नंतर कोलकाता नाईट रायडर्समध्ये गेला. आता या स्पर्धेतील त्याचा तिसरा संघ कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.