भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या १६ सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह याचाही समावेश करण्यात आला आहे. बुमराहला या मालिकेतून विश्रांती दिली जाईल, अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही.
विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराह कसोटीत टीम इंडियाचा उपकर्णधार होता. पण आता या मालिकेत तो केवळ एक खेळाडू म्हणून खेळणार आहे.
वास्तविक, भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपकर्णधाराची भूमिका बजावली होती. पण तो तो बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी उपकर्णधाराची भूमिका बजावताना दिसणार नाही.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बुमराह संघाचा भाग असेल, पण तो कर्णधार रोहित शर्मा याचा उपकर्णधार नसेल. बुमराह हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यच्याशिवाय केएल राहुल आणि विराट कोहली यांच्याकडून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
वास्तविक, भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार कोणालाही करण्यात आलेले नाही.
इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान बुमराह उपकर्णधार होता, परंतु बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी उपकर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही.
पहिली कसोटी १९ सप्टेंबरला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपदाची जबाबदारी न मिळाल्याने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. टीम इंडियातील दिग्गज खेळाडूंमध्ये बुमराहची गणना होते, जे भविष्यात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतात.
असे असतानाही बुमराहला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नाही. यावरून असे दिसून येते की बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन कदाचित त्याला भावी कर्णधार म्हणून पाहत नाहीत. म्हणून त्याला उपकर्णधार बनवण्यात आलेले नाही. आता नव्या खेळाडूची उपकर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते. यात शुभमन गिलचे नाव आघाडीवर आहे.
बुमराहने यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. बुमराहने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-0 मालिकेत संघाची धुरा सांभाळली होती, जिथे त्याच्या नेतृत्वाची खूप प्रशंसाही झाली.
बांगलादेश मालिकेसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह, यश दयाल.