James Anderson : जेम्स अँडरसनला आयपीएल का खेळायचे आहे? त्यानंच सांगितलं खरं कारण
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  James Anderson : जेम्स अँडरसनला आयपीएल का खेळायचे आहे? त्यानंच सांगितलं खरं कारण

James Anderson : जेम्स अँडरसनला आयपीएल का खेळायचे आहे? त्यानंच सांगितलं खरं कारण

Nov 08, 2024 05:43 PM IST

James Anderson, IPL 2025 Mega Auction : वयाच्या ४२व्या वर्षी जेम्स अँडरसनने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या वयातही त्याच्यामध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळतो

James Anderson : जेम्स अँडरसनला आयपीएल का खेळायचे आहे? त्यानंच सांगितलं खरं कारण
James Anderson : जेम्स अँडरसनला आयपीएल का खेळायचे आहे? त्यानंच सांगितलं खरं कारण

आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात २४ व २५ नोव्हेंबर रोजी आयपीएल २०२५ चा मेगा लिलाल होणार आहे. यासाठी जगभरातील क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे.

पण लिलावात आलेले एक नाव पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते नाव आहे इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जेम्स अँडरसनचे.

वयाच्या ४२व्या वर्षी जेम्स अँडरसनने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या वयातही त्याच्यामध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळतो. जर कोणत्याही संघाने अँडरसनला विकत घेतले आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले तर जेम्स अँडरसनचा तो आयपीएलचा पहिलाच सामना असेल.

अँडरसनला आयपीएल का खेळायचे आहे?

जेम्स अँडरसनने स्वतःच खुलासा केला, की तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी इतका उत्सुक का आहे. बीबीसी रेडिओशी बोलताना तो म्हणाला, की त्याला अजूनही खेळात काहीतरी नवीन करायचे आहे आणि आयपीएल त्याच्या खेळाच्या विकासात मदत करू शकते.

जेम्स अँडरसन म्हणाला, "मला वाटते की मला अजूनही खेळाची आवड आहे. मी कधीही आयपीएलमध्ये खेळलो नाही आणि मला वाटते की एक खेळाडू म्हणून मला अजूनही खूप काही ऑफर करायचे आहे."

जेम्स अँडरसनला विश्वास आहे, की आयपीएल अनुभवामुळे त्याला खेळाची नवीन तंत्रे आणि रणनीती समजण्यास मदत होईल, ज्यामुळे त्याचे प्रशिक्षण कौशल्य देखील सुधारेल.

जेम्स अँडरसन म्हणाला, "या मोसमानंतर मी इंग्लंड संघासोबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही सुरू केले आहे. मला वाटते की आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळल्याने मला माझे क्रिकेट ज्ञान आणखी वाढवता येईल, जे भविष्यात माझ्या कोचिंग कारकिर्दीत फायदेशीर ठरू शकते.”

IPL २०२५ मेगा लिलावासाठी १५७४ खेळाडूंची नोंदणी

IPL २०२५ च्या या मेगा लिलावात एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे, ज्यात ११६५ भारतीय आणि ४०९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत ३२० कॅप्ड खेळाडू, १२२४ अनकॅप्ड खेळाडू आणि ३० असोसिएट नेशनच्या खेळाडूंचा समावेश आहे.

Whats_app_banner