IPL 2025: आयपीएलचं यंदाचं मेगा ऑक्शन ठरणार दशकातील सर्वात मोठं, कसं? जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025: आयपीएलचं यंदाचं मेगा ऑक्शन ठरणार दशकातील सर्वात मोठं, कसं? जाणून घ्या!

IPL 2025: आयपीएलचं यंदाचं मेगा ऑक्शन ठरणार दशकातील सर्वात मोठं, कसं? जाणून घ्या!

Nov 12, 2024 06:21 PM IST

IPL 2025 Mega Auction: आयपीएलचे यंदाचे मेगा ऑक्शन दशकातील सर्वात मोठे ऑक्शन ठरण्याची दाट शक्यता आहे.

आयपीएलचं यंदाचं मेगा ऑक्शन ठरणार दशकातील सर्वात मोठं ऑक्शन
आयपीएलचं यंदाचं मेगा ऑक्शन ठरणार दशकातील सर्वात मोठं ऑक्शन

IPL 2025 Auction News: दिवसेंदिवस भारतीय लीग आयपीएलची लोकप्रियता वाढतच चालली आहे.  आयपीएलच्या गेल्या काही लिलावात मोठी बोली लागल्यानंतर गव्हर्निंग कौन्सिलने फ्रँचायझींच्या पर्सचा आकार वाढवला आहे.  आयपीएल २०२५ साठी सर्व फ्रँचायझीच्या पर्सची किंमत १२० करण्यात आली. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात लिलावासाठी एकूण १,५७४ खेळाडूंनी आपली नावे नोंदविली आहेत. हा आकडा जगभरात लीगची लोकप्रियता दर्शवितो. यामुळे आयपीएलचे यंदाचे मेगा ऑक्शन दशकातील सर्वात मोठे ऑक्शन ठरण्याची दाट शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षांत आयपीएल जगभरातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग ठरली आहे. रिषभ पंत, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर हे यावेळी लिलावात दिसतील. पंतने नऊ वर्ष दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले.  तर, केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्स रिलीज केले. विशेष म्हणजे,  कोलकाता नाइट रायडर्सने किताब जिंकूनही त्यांनी श्रेयस अय्यरला रिटेन केले नाही.  अशा महत्त्वाच्या खेळाडूंवर बोली लागण्याची ही पहिलीच वेळ असेल.  पहिल्या आयपीएलनंतर २०११ मध्ये गौतम गंभीर, युवराज सिंह, रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या खेळाडूंवर मोठी बोली लागली होती. मात्र, २०११ च्या मेगा लिलावात ही रक्कम ९० लाख डॉलर (अंदाजे ७६ कोटी रुपये) होती, जी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. गेल्या दशकातील लिलावात उदयोन्मुख तारे किंवा परदेशी क्रिकेटपटूंवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. पंरतु, यावेळी भारतीय खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला २३ कोटी रुपयांत रिटेन करून आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले.  तर, विराट कोहली आणि निकोलस पूरन यांना आपपल्या संघांनी अनुक्रमे २१ कोटी आणि २० रुपयांत रिटेन केले. चार फ्रँचायझींकडे ६५ कोटींहून अधिक रक्कम आहे, त्यामुळे जेद्दाहमध्ये जोरदार बोली लागण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्ज (११०.५ कोटी), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (८३ कोटी) आणि दिल्ली कॅपिटल्स (७३ कोटी) या संघांनी अद्याप आयपीएलची ट्रॉफी जिंकली नाही.

भारतीय आकर्षण

पंत हा प्रत्येक फ्रँचायझीच्या विशलिस्टमधील एक खेळाडू आहे, ज्याच्यासाठी फ्रँचायझी २० कोटींहून अधिक पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. पंत हा उत्कृष्ट विकेटकिपरसह तडाखेबाज फलंदाज आहे.  याशिवाय, तो संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी देखील संभाळू शकतो. आयपीएलच्या गेल्या ऑक्शनमध्ये मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.  यावेळी हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. याशिवाय, युजवेंद्र चहल, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

परदेशी खेळाडूंवरही लागणार मोठी बोली

परदेशी स्टार्स दरवर्षी आयपीएलमध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त तडक्याची भर घालणार आहेत, कारण त्या लिलावासाठी एकूण ४०९ खेळाडूंनी आपली नावे नोंदविली आहेत. दक्षिण आफ्रिका (९१), ऑस्ट्रेलिया (७६) आणि इंग्लंड (५२) हे क्रिकेटमधील दिग्गज संघ या मेगाफ्रँचायझी लीगचे मोठे आकर्षण ठरणार आहेत. जोस बटलर, मिचेल स्टार्क, कगिसो रबाडा, फिल सॉल्ट आणि डेव्हिड मिलर यांच्यासारख्या खेळाडूंमुळे लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननेही पहिल्यांदाच लिलावासाठी आपले नाव ठेवले असून त्याची आधारभूत किंमत सव्वा कोटी रुपये ठेवली आहे.

Whats_app_banner
विभाग