team india next captain :टीम इंडियाने २९ जून रोजी झालेल्या टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. चॅम्पियन बनल्यानंतर २४ तासांतच संघातील ३ दिग्गज निवृत्त झाले. राहुल द्रविडचाही प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता प्रशिक्षकासोबतच नवीन कर्णधाराचीही निवड करावी लागणार आहे.
टीम इंडियाच्या टी-20 फॉरमॅटमधील कर्णधारपदाच्या शर्यतीत सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत असे अनेक स्पर्धक आहेत. पण सध्या तरी हार्दिक पंड्याची बाजू सर्वात मजबूत दिसत आहे.
अशा परिस्थितीत, भारतीय टी-20 संघाचा पुढचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या यांची निवड होईल. याची कारणे काय आहेत, ते जाणून घेऊया.
हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे, त्याने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, याशिवाय आयपीएलमधील आपल्या पहिल्याच कर्णधारपदाच्या कार्यकाळात त्याने गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले. दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्ससारख्या मोठ्या संघाचे नेतृत्व केले.
हार्दिक पांड्याने या T20 विश्वचषकात एकूण आठ सामने खेळले, त्याने ४८ च्या सरासरीने १४४ धावा केल्या, ज्यामध्ये अर्धशतकाचाही समावेश आहे.
फलंदाजीशिवाय पांड्या गोलंदाजीतही हिट ठरला, त्याने १७.३६ च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध २३ धावा आणि अंतिम फेरीत २० धावांत ३ विकेट्स भारताला चॅम्पियन बनवण्यासाठी पुरेशा होत्या.
टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना टीम इंडियाच्या पुढील कर्णधाराबाबत विचारण्यात आले. यावर जय शाह म्हणाले की, हार्दिकने वर्ल्ड कपमध्ये शानदार खेळ केला. निवडकर्ते कर्णधारपदाचा निर्णय घेतील. हार्दिकने स्वतःला सिद्ध केले आहे आणि आम्हाला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. शाह यांचा हा एक इशारा भारताचा पुढचा कर्धणार कोण असेल, हे ओळखण्यासाठी पुरेसा आहे.
संबंधित बातम्या