मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारताचं घोडं नेमंक कुठे अडलंय? रोहित-विराटमुळे टी-20 संघाच्या निवडीला इतका विलंब होतोय का?

भारताचं घोडं नेमंक कुठे अडलंय? रोहित-विराटमुळे टी-20 संघाच्या निवडीला इतका विलंब होतोय का?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 12:06 PM IST

Rohit Sharma Virat Kohli T20 squad : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे ही मालिका खूपच महत्वाची आहे, सोबतच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही टी-20 वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Rohit Sharma Virat Kohli T20 squad
Rohit Sharma Virat Kohli T20 squad (REUTERS)

Rohit Sharma Virat Kohli T20 Squad : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाने आपला संघ (Afghanistan T20 Squad against India) जाहीर केला आहे. पण टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही.

टी-20 मालिका सुरू होण्यासाठी आता केवळ ५ दिवसांचा काळ शिल्लक आहे. भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारील मोहालीत खेळला जाणार आहे.

दरम्यान, जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे ही मालिका खूपच महत्वाची आहे, सोबतच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही टी-20 वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे टीम निवडणे BCCI ला सध्या कठीण जात आहे.

रोहित-विराटमुळे संघ निवडीला विलंब?

विशेष म्हणजे, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील एकाची निवड करणे निवड समितीला सोपे नाही. सध्या तरी दोघांना संघात ठेवले जाईल असे दिसते, पण टी-20 विश्वचषक संघाच्या निवडीसाठी आयपीएलमधीलचा फॉर्म महत्त्वाचा मानला जाणार आहे. 

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर दक्षिण आफ्रिकेला या दोन्ही खेळाडूंशी बोलण्यासाठी गेले होते आणि दोघांनीही स्वतःला टी-20 साठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. परंतु यात बरेच बाह्य घटक आहेत. रोहित किंवा विराट या दोघांपैकी एकाचीच टी-20 संघात निवड केली जाईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आता शेवटी बीसीसीआय सचिव जय शाह आणि वरिष्ठ अधिकारी यांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली

दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर

तिसरा T20- १७ जानेवारी- बेंगळुरू

भारत-अफगाणिस्तान टी-20 कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi