Johnson vs Warner : स्कँडल करणाऱ्या खेळाडूला हिरोसारखी वागणूक का? जॉन्सन क्रिकेट बोर्डावर खवळला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Johnson vs Warner : स्कँडल करणाऱ्या खेळाडूला हिरोसारखी वागणूक का? जॉन्सन क्रिकेट बोर्डावर खवळला

Johnson vs Warner : स्कँडल करणाऱ्या खेळाडूला हिरोसारखी वागणूक का? जॉन्सन क्रिकेट बोर्डावर खवळला

Published Dec 03, 2023 05:55 PM IST

Mitchell Jonshon on David Warner : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या व्यक्तीने घोटाळा केला आहे, त्याला हिरोप्रमाणे निरोप का मिळत आहे, असा सवाल जॉन्सनने केला आहे.

Mitchell Jonshon on David Warner
Mitchell Jonshon on David Warner

Mitchell Jonshon on David Warner Retirement : ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटच्या वेळी पांढरी जर्सी घालणार आहे. वॉर्नर कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही, पण पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र, यावर ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार मिचेल जॉन्सनने प्रश्न उपस्थित केले आहेत.

वॉर्नर फेअरवेल मॅच खेळणार

पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकेतून क्रिकेट ऑस्ट्रेलिया वॉर्नरला निरोप देणार आहे. पण निरोप समारंभावर मिचेल जॉन्सन खूश नाही, त्याने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

खरे तर, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी डेव्हिड वॉर्नरचीही या कसोटी मालिकेसाठी संघात निवड केली आहे, त्याचा कसोटी क्रिेकेटा फॉर्म चांगला नसतानाही त्याची संघात निवड झाली आहे.

वॉर्नरने या मालिकेआधीच निवृत्ती घोषणा केली होती, त्यामुळे क्रिकेट बोर्डाने त्याला फेअरवेल सामना खेळण्याची संधी दिली आहे.

डेव्हिड वॉर्नरला हिरोसारखा निरोप का?

यावर मिचेल जॉन्सनने आपल्या कॉलममध्ये लिहिले, आपण डेव्हिड वॉर्नरच्या फेअरवेल मालिकेची तयारी करत आहोत. पण मला कोणी सांगू शकेल का, आपण असे का करत आहोत? कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि  फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का मिळत आहे? ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या खेळाडूला हिरोसारखा निरोप का दिला जात आहे? चीटिंग करणाऱ्या खेळाडूंना असा आदर देणे योग्य आहे का?

वॉर्नर बॉल टेम्परिंगमध्ये अडकला होता

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाने एक मोठा कांड केला होता. या प्रकाराला सँडपेपर स्कँडल गेट म्हणून ओळखले जाते. याच मालिकेतील एका सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान, ३ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केले होते. यात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि युवा खेळाडू कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनी चेंडूशी छेडछाड केली होती.

या प्रकरणानंतर वॉर्नर, स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घालून कडक शिक्षा केली. आपापल्या शिक्षा भोगल्यानंतर हे खेळाडू क्रिकेटमध्ये परतले. 

एक वर्षे बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी अनेकदा चांगली कामगिरी केली आणि आता तो त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा कसोटी फॉर्म चांगला नसतानाही त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी दिली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या