वॉशिंग्टन सुंदर याचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले. वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत दोन्ही डावात मिळून १० विकेट घेतल्या. यानंतर तो आता प्रचंड चर्चेत आला आहे. आयपीएल मेगा लिलावाच्या दृष्टीने वॉशिंग्टन सुंदरची ही कामगिरी अतिशय मोक्याच्या क्षणी आली आहे.
अशा स्थितीत आयपीएल मेगा लिलावात वॉशिंग्टन सुंदरवर पैशांचा पाऊस पडू शकतो, असे बोलले जात आहे.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्स वॉशिंग्टन सुंदरवर पैशांचा वर्षाव करू शकतो, असे मानले जात आहे. पण यामागील कारणं काय असू शकतात, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
चेन्नई सुपर किंग्ज सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांवर अधिक अवलंबून आहे. वॉशिंग्टन सुंदर चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेला तर फिरकी गोलंदाजीला बळ मिळेल. विशेषत: वॉशिंग्टन सुंदरचा अलीकडचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. तसेच, चेन्नईची पीच फिरकीला उपयुक्त आहे.
पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध १० विकेट्स घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला लिलावात मोठी किंमत मिळू शकते. तसेच, चेपॉकच्या संथ आणि फिरकी अनुकूल विकेटवर वॉशिंग्टन सुंदर विरोधी फलंदाजांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
वॉशिंग्टन सुंदर दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग आहे. याशिवाय तो भारताकडून खेळला आहे. वॉशिंग्टन सुंदरबद्दल असे म्हटले जाते की दबावाच्या परिस्थितीत तो स्वत:ला शांत ठेवतो.चेन्नई सुपर किंग्जला मोठ्या सामन्यांमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या क्षमतेचा फायदा होऊ शकतो. या कारणांमुळे, चेन्नई सुपर किंग्ज कोणत्याही किंमतीत वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करू इच्छित आहे.
वॉशिंग्टन सुंदरचे नाव भारतातील सर्वात तेजस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. गोलंदाजीशिवाय हा खेळाडू फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. विशेषत: गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर किफायतशीर षटके टाकण्यासाठी ओळखला जातो.
वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूंवर धावा काढणे विरोधी फलंदाजांसाठी सोपे राहिलेले नाही. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जमध्ये वॉशिंग्टन सुंदर हा रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो.
संबंधित बातम्या