(4 / 6)अर्शद नदीमला किती बक्षीस रक्कम मिळाली?- ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरू झाले. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना पदके देण्यात आली. टोकियो ऑलिम्पिकपर्यंत कोणत्याही विजेत्याला बक्षीस रक्कम दिली जात नव्हती, मात्र यावेळी जागतिक ऍथलेटिक्सने बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नदीमला ५० हजार डॉलर्स मिळाले. पाकिस्तानी रुपयात ते अंदाजे १ कोटी ४० लाख रुपये झाले. कोणत्याही ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकासाठी ही बक्षीस रक्कम मिळते. जर एकापेक्षा जास्त खेळाडू असतील तर बक्षिसाची रक्कम त्यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागली जाते.(PTI)