Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा कॅप्टनसी युद्ध? रोहित, सूर्या, हार्दिक की बुमराह? कोण होणार कर्णधार?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा कॅप्टनसी युद्ध? रोहित, सूर्या, हार्दिक की बुमराह? कोण होणार कर्णधार?

Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा कॅप्टनसी युद्ध? रोहित, सूर्या, हार्दिक की बुमराह? कोण होणार कर्णधार?

Nov 19, 2024 08:10 PM IST

Mumbai Indians Captain IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ साठी एकूण ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. एमआयने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि आता त्याच्या पर्समध्ये ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा कॅप्टनसी युद्ध? रोहित, सूर्या, हार्दिक की बुमराह? कोण होणार कर्णधार?
Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा कॅप्टनसी युद्ध? रोहित, सूर्या, हार्दिक की बुमराह? कोण होणार कर्णधार? (ANI)

आयपीएल २०२५ साठी सर्व संघांची रिटेन्शन लिस्ट पाहता पुढील सीझनमध्ये अनेक संघांचे कर्णधार बदलणार, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने ५ खेळाडूंना रिटेन करताना एकूण ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

एमआय फ्रँचायझीने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले आहे. यापैकी ४ खेळाडू भारतीय संघाचे कर्णधार राहिले आहेत, अशा परिस्थितीत यावेळी मुंबईचा कर्णधार कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जर आपण मुंबई इंडियन्सच्या इतिहासावर नजर टाकली तर, गेल्या वर्षी एमआयने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते.  मात्र रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय चाहत्यांना आवडला नाही.

एकीकडे, रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेतल्याने एमआय व्यवस्थापनाला ट्रोल व्हावे लागले, तर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहावे लागले. याशिवाय हार्दिक आणि रोहित यांच्यातील भांडणाच्या बातम्यांमुळेही एमआय संपूर्ण हंगाम चर्चेत राहिली.

यावेळी कोण होणार कर्णधार?

जेव्हा मुंबई इंडियन्सने ३१ ऑक्टोबर रोजी त्यांची रिटेन यादी जाहीर केली तेव्हा एमआयने असेही घोषित केले होते, की पुढील हंगामातही हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार असेल. हा निर्णय खूपच धक्कादायक आहे कारण गेल्या मोसमात मुंबई पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होती.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तर २०२३ मध्ये गुजरातला अंतिम फेरीतही नेले होते. पुढच्या मोसमात हार्दिक मुंबईचे नशीब बदलू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी जेव्हा हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यावर हार्दिकसोबतच MI व्यवस्थापनालाही खूप ट्रोल व्हावे लागले. 

रोहित-हार्दिकच्या मतभेद असतली, तर मॅनेजमेंटसमोर सूर्यकुमार यादव यालाही कर्णधार बनवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण असे घडते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.  विशेष म्हणजे,सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग ३ टी-20 मालिका जिंकल्या आहेत. 

 

Whats_app_banner