Sanju Samson : संजू सॅमसन नसेल तर मग कोण होणार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार? ही नावं चर्चेत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : संजू सॅमसन नसेल तर मग कोण होणार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार? ही नावं चर्चेत

Sanju Samson : संजू सॅमसन नसेल तर मग कोण होणार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार? ही नावं चर्चेत

Feb 04, 2025 10:05 PM IST

Rajasthan Royals Captain : संजू सॅमसनला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे ५ ते ६ आठवडे लागतील. मात्र, संजू सॅमसन आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे मानले जात आहे.

Sanju Samson : संजू सॅमसन नसेल तर मग कोण होणार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार? ही नावं चर्चेत
Sanju Samson : संजू सॅमसन नसेल तर मग कोण होणार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार? ही नावं चर्चेत (AP)

Sanju Samson Injury, Rajasthan Royals : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा सेल्फलेस फलंदाज संजू सॅमसन याला दुखापत झाली होती. या स्फोटक यष्टीरक्षक फलंदाजाचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे ५-६ आठवडे लागतील. 

सोबतच, संजू सॅमसन आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये सहभागी होणार नसल्याचे मानले जात आहे.

आता प्रश्न असा आहे की संजू सॅमसन खेळला नाही तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार कोण असेल? यासाठी दावेदार कोण आहेत? 

वास्तविक, संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत कर्णधारपदासाठी अनेक दावेदारांची नावे समोर येत आहेत. पण या शर्यतीत आघाडीवर असलेल्या नावांवर आपण नजर टाकू.

संजूच्या अनुपस्थितीत रियान परागला संधी मिळेल का?

संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होऊ शकतो. वास्तविक या खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये आसामचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान रियान परागने आपण कर्णधार बनण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. एक चांगला कर्णधार बनण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेत.

तसेच रियान परागचा राजस्थान रॉयल्ससोबतचा शेवटचा हंगाम उत्कृष्ट होता. या काळात तो एक चांगला क्रिकेटपटू म्हणून उदयास आला. अशा स्थितीत, संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकतो, असे मानले जात आहे.

शिमरन हेमायरदेखील कर्णधार होऊ शकतो

रियान पराग व्यतिरिक्त, संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहे. वास्तविक, हा कॅरेबियन फलंदाज कर्णधार म्हणून खेळला आहे. शिमरन हेमायरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

याशिवाय शिमरन हेटमायरने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना ॲमेझॉनचे नेतृत्व केले आहे. मात्र, अशाप्रकारे शिमरॉन हेटमायरसाठी कर्णधारपद ही नवीन गोष्ट असणार नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या