बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन गुरुवारी (१३ जून) नेदरलँड्सविरुद्ध फॉर्ममध्ये परतला. शकीबने ४६ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावांची खेळी केली. शाकिबने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. शाकिबने ८ वर्षांनंतर टी-20 विश्वचषकात अर्धशतक झळकावले.
शकिबला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शकिबने अशी प्रतिक्रिया दिली, जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
शाकिब अल हसनने फॉर्ममध्ये येताच त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याने सर्वप्रथम भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला. सेहवागने शाकिबच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले होते. शाकिबने टी-20 फॉरमॅटमधून खूप आधी निवृत्ती घ्यायला हवी होती, असे सेहवागने म्हटले होते.असे वीरू म्हणाला होता.
३७ वर्षीय दिग्गज खेळाडू शकिबने नेदरलँडविरुद्ध नाबाद ६४ (४६ चेंडूत) धावा केल्या.
वीरेंद्र सेहवाग क्रिकबझच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता की, “गेल्या विश्वचषकातच मला असे वाटले होते की शाकिबची टी-20 फॉरमॅटमध्ये निवड होऊ नये. त्याची निवृत्तीची वेळ फार पूर्वीच आली होती. तो तसा वरिष्ठ खेळाडू आहे. तो संघाचा कर्णधार होता. त्याची टी-20 मधील आकडेवारी पाहता त्याला लाज वाटली पाहिजे. त्याने आता स्व:ता पुढे येऊन सांगितले पाहिजे, की खूप झाले, मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे”.
मात्र, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिब अल हसनने वीरेंद्र सेहवागला जोरदार टोला लगावला. सेहवागच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्याल, असे विचारले असता, ३७ वर्षीय शकिब अल हसनने उत्तर दिले, "कोण आहे सेहवाग?" साकिबच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्या अर्धशतकानंतर शाकिब म्हणाला की, खेळाडूचे काम कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे नसून आपल्या संघासाठी प्रत्येक प्रकारे योगदान देणे आहे. जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने पहिली गोष्ट विचारली - कोण? सेहगाग!.
यानंतर शकिब पुढे म्हणाला, “खेळाडू कधीही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला येत नाही. बॅट किंवा बॉलने संघासाठी योगदान देणे हे खेळाडूचे काम असते. कुणालाही उत्तर देण्याची गरज नाही. मला वाटते की, खेळाडू संघासाठी किती योगदान देतो हे महत्त्वाचे आहे. जेव्हा तो योगदान देऊ शकत नाही, तेव्हा नक्कीच चर्चा होईल आणि मला वाटते की त्यात काहीही चुकीचे नाही.
बांगलादेशला आपला शेवटचा साखळी सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे आणि जर बांगलादेशने तो जिंकला तर ते सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील.
संबंधित बातम्या