मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Zaman Khan : मलिंगासारखी अ‍ॅक्शन! नसीम शाहची जागा घेणारा जमान खान कोण आहे? असा आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड

Zaman Khan : मलिंगासारखी अ‍ॅक्शन! नसीम शाहची जागा घेणारा जमान खान कोण आहे? असा आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड

Sep 14, 2023 08:28 PM IST

who is zaman khan pakistan bowler : आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जमान खानचा समावेश केला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने जमान खानला डेब्यू कॅप दिली.

who is zaman khan
who is zaman khan

zaman khan debut in odi : आशिया कप 2023 च्या महत्त्वाच्या सामन्यात आज पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने आहेत. उभय संघांमधील सामना कोलंबोमध्ये खेळवला जात आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जमान खानचा समावेश केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अशा प्रकारे जमान खान पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने जमान खानला डेब्यू कॅप दिली. वास्तविक, पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि मोहम्मद नसीम या सामन्यात खेळत नाहीत. यामुळे जमान खान आणि मोहम्मद वसीम ज्युनियरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.

जमान खानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 

जमान खानबद्दल सांगायचे तर, या खेळाडूने पाकिस्तानसाठी ६ टी-20 सामने खेळले आहेत. मात्र, आतापर्यंत जमान खानला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. तर जमान खान आज श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण करत आहे. जमान खानच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने ६ T20 सामन्यात ४ विकेट घेतल्या आहेत. 

जमान खान या संघांसाठी खेळला आहे

पाकिस्तान व्यतिरिक्त, जमान खान लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्ज, पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर, डर्बीशायर, टोरंटो नॅशनल्स आणि कॅनडा टी20 लीगमध्ये मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळला आहे. पाकिस्तान-श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 

वास्तविक, हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्याचबरोबर या सामन्यात हरणाऱ्या संघाचा प्रवास संपुष्टात येईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, आता अंतिम फेरीत भारताला कोणता संघ आव्हान देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४