६ फूट ४ इंच उंचीच्या गोलंदाजानं रोहित-रहाणेला तंगवलं, पुलवामामध्ये जन्मलेला उमर नजीर मीर कोण आहे? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ६ फूट ४ इंच उंचीच्या गोलंदाजानं रोहित-रहाणेला तंगवलं, पुलवामामध्ये जन्मलेला उमर नजीर मीर कोण आहे? जाणून घ्या

६ फूट ४ इंच उंचीच्या गोलंदाजानं रोहित-रहाणेला तंगवलं, पुलवामामध्ये जन्मलेला उमर नजीर मीर कोण आहे? जाणून घ्या

Jan 25, 2025 10:59 AM IST

Mumbai vs Jammu and Kashmir Ranji Trophy : मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफीचा सामना मुंबईच्या बीकेसी मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यत काश्मीर समोर विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य आहे.

Who Is Umar Nazir Mir : पुलवामामध्ये जन्म, उंची ६ फूट ४ इंच… जम्मू काश्मीरच्या उमर नजीर मीरने रोहित-रहाणेला तंगवलं
Who Is Umar Nazir Mir : पुलवामामध्ये जन्म, उंची ६ फूट ४ इंच… जम्मू काश्मीरच्या उमर नजीर मीरने रोहित-रहाणेला तंगवलं

Who Is Umar Nazir Mir : वय ३१ वर्षे, उंची ६ फूट ४ इंच… एक असा वेगवान गोलंदाज, जो कोणत्याही फलंदाजाला आपल्या वेगाने आणि स्विंगने चकीत करू शकतो. याच वेगवान गोलंदाजाने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या दिग्गजांना आपली शिकार बनवले. या गोलंदाजाचे नाव उमर नजीर मीर असून तो जम्मू काश्मीर साठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.

मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफीचा सामना मुंबईच्या बीकेसी मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यत काश्मीर समोर विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य आहे.

तत्पूर्वी, या सामन्या जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमर नजीर मीर याने सर्वांनाच प्रभावित केले. उमर नजीर मीरने घातक गोलंदाजी करत रोहित शर्मापासून कर्णधार अजिंक्य रहाणेपर्यंत सर्वांना त्रस्त केले. त्याची कामगिरी पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

वास्तविक, भारतीय कर्णधार रोहित शर्माचे दीर्घ कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांना तो नक्कीच चांगली खेळी करेल अशी आशा होती. पण इथेही त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. तो पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात २८ धावा करून बाद झाला.

पहिल्या डावात उमर मीरने त्याला शॉर्ट बॉलवर झेलबाद केले. रोहित शर्माला बाद केल्यापासून उमर नजीर मीर चांगलाच चर्चेत आला आहे.  उमरने या सामन्यात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक तामोरे यांची शिकार केली.

कोण आहे उमर नजीर मीर?

उमर नजीर मीर हा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९९३ रोजी पुलवामा येथे झाला होता. ६ फूट ४ इंच उंचीमुळे तो देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात उंच वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यासाठी ओळखला जातो.

उमर नजीर मीरने २०१३ मध्ये आसामविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ५७ सामन्यात १३८ विकेट घेतल्या आहेत.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५४ बळी आहेत, तर टी-20 मध्ये या वेगवान गोलंदाजाने ३२ फलंदाजांना बाद केले आहे. 

उमरला २०१८-१९ मध्ये देवधर ट्रॉफीसाठी भारत क संघात देखील स्थान देण्यात आले होते. उमरने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये ६ वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला होता.

उमर नजीर मीर ग्लेन मॅकग्राला आपला आदर्श मानतो

उमर नजीर मीर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला आपला आदर्श मानतो. उमर नजीर मीरला अद्याप आयपीएलमधील कोणत्याही फ्रँचायझीकडून करार मिळवता आलेला नाही. पण त्याने पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी नेट बॉलर म्हणून काम केले आहे.

वास्तविक, उमर नजीर मीरला त्याच्या उंचीचा फायदा होतो. ६ फूट ४ इंच उंच उमरचा चेंडू पडल्यानंतर चांगला उसळतो. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन या गोलंदाजानेही स्वत:मध्ये सुधारणा केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या