U19 Asia Cup 2023 : UAE मध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या अंडर-१९ आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. उदयोन्मुख फलंदाज उदय सहारन भारताचे नेतृत्व करेल.
१९ वर्षीय उदय सहारन हा राजस्थानचा रहिवासी आहे, पण तो पंजाबकडून खेळतो. मागील अंडर-१९ विश्वचषकादरम्यान त्याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.
१५ सदस्यीय संघाच्या उपकर्णधारपदी सौम्य कुमार पांडेची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ अंडर-१९ आशिया कपमध्ये ८ वेळा चॅम्पियन असून या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळसह एकाच गटात ठेवण्यात आले आहे.
१९ वर्षांखालील आशिया चषक ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ८ डिसेंबर रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर १० डिसेंबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.
भारतीय संघ १२ डिसेंबरला नेपाळला भिडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ डिसेंबर रोजी दुबई येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा गत चॅम्पियन आहे.
आशिया कपसाठी भारताचा अंडर-१९ संघ : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार) ), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
ट्रॅव्हल स्टँडबाय खेळाडू: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.
राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी. विघ्नेश, किरण चोरमले