रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये धमाकेदार कामगिरी करत स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्यांनी WPL च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. विशेष म्हणजे आरसीबी फ्रँचायझीची ही गेल्या १६ वर्षांतील पहिलीच ट्रॉफी आहे.
फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकांत हे लक्ष्य गाठले.
दरम्यान, आरसीबीचे चाहते गेल्या १६ वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहत होती. आरसीबीचा पुरुष संघ आयपीएलमध्ये तीनदा फायनलमध्ये पोहोचला होता. पण प्रत्येकवेळी त्यांच्या नशिबी पराभवच आला. यामुळे सोशल आरसीबीला प्रचंड ट्रोल केले जाते. पण आता आरसीबीच्या महिला संघाने कमाल करत पहिली वहिली ट्रॉफी जिंकली आहे.
आरसीबीचे पहिले मालक किंगफिशरचे विजय मल्ल्या आणि युनायटेड स्पिरिट्स होते. पण २०१६ पासून मल्ल्या यांच्याकडे आरसीबीची मालकी नाही.
मद्य व्यापारी विजय मल्ल्या आणि युनायटेड स्पिरिट्सने २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझी खरेदी केली. १११.६ मिलियन्स डॉलर्समध्ये आरसीबीची खरेदी झाली होती. मुंबई इंडियन्सनंतर (१११.९ मिलियन डॉलर्स) हा आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा संघ होता.
आरसीबीचा संघ हा आता युनायटेड स्पिरिट्सच्या मालकीचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या वेबसाइटनुसार, 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, म्हणजेच आरसीबी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीची आहे. मल्ल्या यापूर्वी या कंपनीचे अध्यक्ष होते, मात्र त्यांनी २०१६ मध्येच या पदाचा राजीनामा दिला.
युनायटेड स्पिरिट्स हा यूके स्थित व्यवसाय समूह डियाजिओ पीएलसीचा एक भाग आहे. विजय मल्ल्या यांच्यावर १७ भारतीय बँकांचे ९००० कोटींचे कर्ज थकवल्याचा आरोप आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मल्ल्या लंडनला पळून गेले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली बराच काळ खेळापासून दूर आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले होते. खरंतर, विराट कोहली फेब्रुवारी २०२४ मध्ये दुसऱ्यांदा वडील झाला, त्यामुळे त्याने काही काळ खेळातून ब्रेक घेतला. तथापि, आता किंग कोहली भारतात परतला आहे आणि तो आता आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.