मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार कोण? हार्दिक पंड्यापेक्षाही जास्त मानधन मिळणार

IPL 2024 : आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार कोण? हार्दिक पंड्यापेक्षाही जास्त मानधन मिळणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 08, 2024 12:24 PM IST

IPL 2024 Captain Salary : आयपीएल २०२४ मध्ये सहभागी होणाऱ्या संघांच्या कर्णधारांना मिळणाऱ्या मानधनाची यादी समोर आली आहे. त्यात केएल राहुलनं बाजी मारली आहे.

IPL 2024 Highest Paid Captain
IPL 2024 Highest Paid Captain

Highest Paid captain of IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL) चा नवा सीझन लवकरच सुरू होणार असून या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होत आहेत. या प्रत्येक संघांच्या कर्णधारांना मिळणाऱ्या मानधनाची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी केएल राहुल हा सर्वात महागडा ठरला आहे.

केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करत आहे. त्याला सर्वाधिक मानधन मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराला सर्वात कमी मानधन मिळणार आहे. मात्र, आयपीएल सुरू होण्याआधी हा संघ नवीन कर्णधाराची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सध्या एडन मार्करम यांच्याकडं सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद आहे. त्याचं मानधन २.६ कोटी रुपये आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचं मानधन सर्वाधिक आहे. केएल राहुलला १७  कोटी रुपये मिळणार आहेत. दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आहे. पंतला १६ कोटी रुपये मिळतील.

दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. पंत कर्णधारपदासाठी तयार नसल्यास डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारेल असं रिकी पाँटिंग यांनी म्हटलं आहे. 

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या यंदा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिक यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, परंतु तो मुंबई इंडियन्ससोबत सर्व रोख करार करून मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. 

कोणत्या कर्णधाराला किती मानधन?

चेन्नई सुपर किंग्ज (एमएस धोनी) - १२ कोटी रुपये

मुंबई इंडियन्स (हार्दिक पंड्या) - १५ कोटी रुपये

कोलकाता नाइट रायडर्स (श्रेयस अय्यर) १२.२५ कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (फाफ डु प्लेसिस) - ७ कोटी रुपये

लखनौ सुपर जायंट्स (केएल राहुल) - १७ कोटी रुपये

गुजरात टायटन्स ( शुभमन गिल ) - ८ कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स ( ऋषभ पंत ) - १६ कोटी रुपये

पंजाब किंग्स (शिखर धवन ) - ८.२५ कोटी रुपये

राजस्थान रॉयल्स ( संजू सॅमसन ) - १४ कोटी रुपये

सनरायझर्स हैदराबाद ( एडन मार्करम ) - २.६ कोटी रुपये

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi