भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ १९ सप्टेंबरपासून आमनेसामने येणार आहेत. त्याचबरोबर या कसोटीपूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा त्याच्या उंची आणि वेगामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. त्यानेप पाकिस्तानविरूद्ध तुफानी गोलंदाजी केली होती. आता तो टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी अडचणीचा ठरू शकतो, असे मानले जात आहे.
नाहिद राणाची उंची ६.५ फूट आहे, तो ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत टीम इंडियाने त्याच्या तोडीचा गोलंदाज आपल्या संघात आणला आहे. त्याचे नाव गुरनूर ब्रार आहे.
गुरनूर ब्रारबद्दल कोण आहे?
भारतीय संघाने ६.५ फूट उंचीच्या वेगवान गोलंदाजाला नेट सरावासाठी बोलावले आहे, जेणेकरून भारतीय फलंदाजाला नाहिद राणाच्या चेंडूची आणि उंचीची सवय व्हावी. पण तुम्हाला या फास्ट बॉलरबद्दल माहिती आहे का? वास्तविक, भारतीय संघाने पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याला नेट सरावासाठी चेन्नईला बोलावले आहे.
गुरनूर ब्रारने आतापर्यंत ५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ७ विकेट घेतल्या आहेत. पण नाहिद राणाविरुद्ध गुरनूर ब्रार टीम इंडियाच्या फलंदाजांना तयार करू शकेल का, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पहिल्या कसोटीनंतर मिळू शकते.
दरम्यान, नाहिद राणाने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत घातक गोलंदाजी दाखवली होती. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाहिद राणाने ४४ धावांत ४ बळी घेतले होते. त्याच्या गोलंदाजीमुळेच बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला.
अशा प्रकारे बांगलादेशने पाकिस्तानला २-० ने हरवून इतिहास रचला. त्याचबरोबर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणाची खास गोष्ट म्हणजे त्याच्याकडे ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
गुरनूर ब्रारने विराटला गोलंदाजी केली
६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज गुरनूर ब्रार याने विराट कोहलीसमोरही धारदार गोलंदाजी केली. त्याने सराव सत्रात विराटला अनेकवेळा बीट केले. गुरनूर केवळ १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत नाही तर त्याच्या उंचीमुळे त्याच्या चेंडूंना चांगली उसळीही मिळते.