Simran Shaikh : धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख कोण आहे? गुजरात जायंट्सनं १९ पट अधिक पैसे मोजले, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Simran Shaikh : धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख कोण आहे? गुजरात जायंट्सनं १९ पट अधिक पैसे मोजले, वाचा

Simran Shaikh : धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख कोण आहे? गुजरात जायंट्सनं १९ पट अधिक पैसे मोजले, वाचा

Dec 15, 2024 07:52 PM IST

Who is Simran Shaikh WPL Auction 2025 : गुजरात जायंट्सने धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख हिच्यावर पैशांचा पाऊस पाडला आहे. गुजरातने तिला लिलावात १.९० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले.

Simran Shaikh : धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख कोण आहे? गुजरात जायंट्सनं १९ पट अधिक पैसे देऊन खरेदी केलं, वाचा
Simran Shaikh : धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख कोण आहे? गुजरात जायंट्सनं १९ पट अधिक पैसे देऊन खरेदी केलं, वाचा

Simran Shaikh In Gujrat Giants WPL Auction 2025 : महिला प्रीमियर लीग २०२५ साठी आज खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडला. गुजरात जायंट्सने या महिला प्रीमियर लीग २०२५ साठीच्या लिलावात एका युवा खेळाडूवर पैशांचा पाऊस पाडला आहे. WPL लिलावात गुजरातने सिमरन शेख हिला विकत घेतले आहे. 

सिमरनने शिक्षण सोडून क्रिकेटची निवड केली. ती मुंबईच्या धारावी येथील रहिवासी आहे. तिनी आपले आयुष्य झोपडपट्टीत घालवले आहे. आता ती प्रतिभावान क्रिकेटर बनली आहे. गुजरातने सिमरनला मूळ किमतीपेक्षा १९ पट अधिक किमतीत विकत घेतले आहे.

महिला प्रीमियर लीग लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सिमसन शेखवर पहिली बोली लावली. दिल्लीने १० लाख रुपयांची बोली लावली. ही सिमरनची मूळ किंमत होती. यानंतर गुजरात जायंट्स या बोलीत सामील झाले. दिल्लीने १.८० कोटी रुपयांची शेवटची बोली लावली.

पण गुजरातने १.९० कोटींची बोली लावून सिमरनला आपल्या संघात घेतले. अशाप्रकारे, सिमरनला मूळ किमतीपेक्षा १९ पट अधिक किमतीत खरेदी करण्यात आले.

दहावीनंतर सिमरनने सोडले शिक्षण

सिमरनचे वडील जाहिद अली यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, सिमरनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती खेळताना अनेक जण तिला बरे वाईट बोलायचे. पण सिमरनने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिमरनने १०वीनंतर शिक्षण सोडले होते.

सिमरन WPL मध्ये यूपीकडून खेळली आहे 

सिमरन ही मधल्या फळीतील फलंदाज आहे. गेल्या हंगामात तिला खरेदीदार मिळाला नाही. पण या मोसमात मोठी रक्कम मिळाली. तिने WPL मध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. या काळात तिला ७ डावात फलंदाजीची संधी मिळाली. पण ती विशेष काही करू शकलो नाही.

सिमरन महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स महिला संघाकडून खेळली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबईकडून खेळते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या