USA vs PAK : मुंबईसाठी रणजी, भारतासाठी U-19 वर्ल्डकप… पाकिस्तानला धुळ चारणारा सौरभ नेत्रावलकर कोण आहे? वाचा-who is saurabh netravalkar bowled super over vs pakistan played u 19 wc for india know full profile saurabh netravalkar ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs PAK : मुंबईसाठी रणजी, भारतासाठी U-19 वर्ल्डकप… पाकिस्तानला धुळ चारणारा सौरभ नेत्रावलकर कोण आहे? वाचा

USA vs PAK : मुंबईसाठी रणजी, भारतासाठी U-19 वर्ल्डकप… पाकिस्तानला धुळ चारणारा सौरभ नेत्रावलकर कोण आहे? वाचा

Jun 07, 2024 04:16 PM IST

Who is Saurabh Netravalkar : सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने गोलंदाजी केली. पण या षटकात १९ धावा दिल्या. त्याने या षटकात भरपूर अवांतर धावा दिल्या. त्याने ३ वाइडसह १० धावा अवांतर दिल्या याचाच फटका पाकिस्तानला बसला आणि त्यांचा सुपर ओव्हर ओव्हरमध्ये पराभव झाला.

USA vs PAK : मुंबईसाठी रणजी, भारतासाठी U-19 वर्ल्डकप… पाकिस्तानला धुळ चारणारा सौरभ नेत्रावलकर कोण आहे? वाचा
USA vs PAK : मुंबईसाठी रणजी, भारतासाठी U-19 वर्ल्डकप… पाकिस्तानला धुळ चारणारा सौरभ नेत्रावलकर कोण आहे? वाचा

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा ११ वा सामना गुरुवारी (६ जून) अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.

तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेनेही १५९ धावाच केल्या. यानंतर सुपर ओव्हर खेळली गेली.

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने गोलंदाजी केली. पण या षटकात १९ धावा दिल्या. त्याने या षटकात भरपूर अवांतर धावा दिल्या. त्याने ३ वाइडसह १० धावा अवांतर दिल्या याचाच फटका पाकिस्तानला बसला आणि त्यांचा सुपर ओव्हर ओव्हरमध्ये पराभव झाला.

पण अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकरने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आणि केवळ १३ धावा दिल्या आणि इफ्तिखार अहमदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभने सुपर ओव्हरपूर्वी ४ षटकांच्या कोट्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटकात केवळ १८ धावा दिल्या आणि मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमदचे दोन बळीही घेतले. तो अमेरिकेसाठी मॅचविनर म्हणून उदयास आला.

मराठमोळा सौरभ भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक खेळला

मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सौरभ भारताकडून अंडर-१९ विश्वचषकही खेळला आहे. तथापि, चांगल्या संधींसाठी तो अमेरिकेत गेला.

३२ वर्षीय सौरभने सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत १९ धावा होऊ दिल्या नाहीत. डावखुरा मध्यमगती गोलंदाज सौरभचा जन्म १९९१ मध्ये मुंबईत झाला. २००८-०९ कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने ६ सामन्यांत ३० बळी घेतले. त्यानंतर २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

केएल राहुलसोबत अंडर-१९ विश्वचषक खेळला

यानंतर, न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१० अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासह सौरभ टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्या अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीतून बाहेर पडला होता.

२०१० च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सौरभने ६ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. २५ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वेळी, त्याचा इकॉनॉमी रेट ३.११ होता. सौरभशिवाय इतर ३ खेळाडूंनी सिनियर टीम इंडियामध्ये स्थान मिळवले, पण सौरभला मुकावे लागले.

यानंतर त्याने रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्येही भाग घेतला. तथापि, काहीतरी चांगली संधी शोधण्यासाठी, तो अमेरिकेत गेला आणि तेव्हापासून तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. तो अमेरिकन संघाचा कर्णधारही राहिला आहे.

रणजी आणि विजय हजारे मुंबईकडून खेळला

सौरभने २०१३-१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २२ डिसेंबर २०१३ रोजी त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. तर, सौरभने २७ फेब्रुवारी २०१४ रोजी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केले. त्यानंतर तो या संघासोबत विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला.

सौरभ हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने मुंबईतील विद्यापीठातून शिक्षण घेतले असून तो सध्या ओरॅकल कंपनीत कार्यरत आहे.

जानेवारी २०१८ मध्ये सौरभने अमेरिकन संघात स्थान मिळवले. त्यानंतर तो या संघासोबत २०१८-१९ ICC वर्ल्ड T20 अमेरिका क्वालिफायर स्पर्धेत खेळला. ऑक्टोबर २०१८ मध्येच सौरभ अमेरिकन संघाचा कर्णधार बनला होता. २०१९ मध्ये, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच यूएस संघाचे नेतृत्व केले. सौरभच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अमेरिकेकडून ५ विकेट घेण्याचा विक्रमही आहे.

सौरभ नेत्रावळकरची क्रिकेट कारकीर्द

सौरभच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आत्तापर्यंत अमेरिकेसाठी ४८ एकदिवसीय आणि २९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७८ आणि टी-20 मध्ये २९ विकेट्स आहेत.

एकदिवसीयमध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ३२ धावांत ५ विकेट आहे, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये १२ धावांत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच्या नावावर एक प्रथम श्रेणी सामना आहे, ज्यामध्ये त्याने ३ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ८० लिस्ट-ए सामन्यांमध्ये ११७ विकेट घेतल्या आहेत. एकूण लीग आणि आंतरराष्ट्रीय T20 यासह त्याच्या नावावर २९ सामने आहेत, ज्यात त्याने २९ विकेट घेतल्या आहेत.