Sameer Rizvi : समीर रिझवी कोण आहे? चेन्नईने अनकॅप्ड खेळाडूसाठी ८ कोटी का लावले? आता धोनीसोबत खेळणार-who is sameer rizvi chennai super kings buy him in 8 4 crore rupees in ipl auction 2024 know about sameer rizvi up t20 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sameer Rizvi : समीर रिझवी कोण आहे? चेन्नईने अनकॅप्ड खेळाडूसाठी ८ कोटी का लावले? आता धोनीसोबत खेळणार

Sameer Rizvi : समीर रिझवी कोण आहे? चेन्नईने अनकॅप्ड खेळाडूसाठी ८ कोटी का लावले? आता धोनीसोबत खेळणार

Mar 27, 2024 03:25 PM IST

who is sameer rizvi : उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या युवा अनकॅप्ड समीर रिझवीला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने समीर रिझवीवर ८.४० कोटी रुपये खर्च केले आहेत.

sameer rizvi IPL Auction
sameer rizvi IPL Auction

sameer rizvi IPL Auction 2024 : आयपीएल २०२४ साठी आज (१९ डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव दुबईत पार पडला. या मिनी लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले होते. मात्र, त्यापैकी केवळ ७२ खेळाडूंवरच बोली लावण्यात आली.मात्र,

आयपीएलच्या मिनी लिलावात अनेक भारताच्या अनकॅप्ड खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडला आहे. त्याचबरोबर या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंसाठी संघांनी बोली लावली नाही.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या युवा अनकॅप्ड समीर रिझवीला (sameer rizvi IPL Auction 2024) आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने समीर रिझवीवर ८.४० कोटी रुपये खर्च केले आहेत. 

समीर रिझवी कोण आहे?

चेन्नई सुपर किंग्सने २० वर्षीय समीरवर मोठा सट्टा लावला आहे. समीर गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याचेच फळ त्याला या लिलावात मिळाले. समीरची बेस प्राइस २० लाख रुपये होती.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या समीर रिझवीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ११ लिस्ट-ए आणि ११ टी-20 सामने खेळले आहेत. 

UP T20 लीगमध्ये वादळ निर्माण केलं

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये समीरची बॅट चांगलीच बोलली. या स्पर्धेत कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना समीरने १० सामन्यात ५०.५६ च्या सरासरीने आणि १८८.८ च्या स्ट्राइक रेटने ४५५ धावा केल्या.

UP T20 लीगमध्ये समीर सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. समीरने या स्पर्धेत २ शतके झळकावली होती. याशिवाय त्याने एक अर्धशतकही झळकावले. समीरने या स्पर्धेत अतिशय आक्रमक शैली दाखवली होती, त्यानंतर तो सर्वांच्या नजरेत आला. 

आता चेन्नई संघाने त्याला आपल्या संघात घेतले आहे. समीर षटकार आणि चौकार मारण्यात माहीर आहे. यूपी टी-20 लीगच्या १०  सामन्यांमध्ये समीरने ३८ चौकार आणि ३५ षटकार मारले होते.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी

यानंतर नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही समीरने चमक दाखवली. देशांतर्गत टी-२० स्पर्धेत समीर सर्वाधिक धावा करणारा १३वा खेळाडू होता. समीरने ७ सामन्यांच्या ७ डावात ६९.२५ च्या सरासरीने आणि १३९.९० च्या स्ट्राईक रेटने २७७ धावा केल्या होत्या. यावेळी त्याच्या बॅटमधून १८ चौकार आणि १८ षटकार मारले गेले. या स्पर्धेत समीरने २ अर्धशतके झळकावली होती.

समीर रिझवीची आत्तापर्यंतची टी-20 कारकीर्द 

समीरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११ टी-20 सामने खेळले आहेत, ९ डावात फलंदाजी करत त्याने ४९.१६ च्या सरासरीने आणि १३४.७० च्या स्ट्राइक रेटने २९५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत.

Whats_app_banner