WPL 2024 : शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या असताना षटकार ठोकणारी मुंबई इंडियन्सची नवी स्टार सजीवन सजना आहे कोण?-who is sajeevan sajana she hits last ball six in wpl 2024 match and won match for mumbai indians against delhi capitals ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WPL 2024 : शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या असताना षटकार ठोकणारी मुंबई इंडियन्सची नवी स्टार सजीवन सजना आहे कोण?

WPL 2024 : शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या असताना षटकार ठोकणारी मुंबई इंडियन्सची नवी स्टार सजीवन सजना आहे कोण?

Feb 24, 2024 03:32 PM IST

Who Is Sajeevan Sajana : २९ वर्षीय सजीवन सजना केरळकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळते. फिरकी अष्टपैलू खेळाडू सजीवनला पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

Who Is Sajeevan Sajana mumbai indians
Who Is Sajeevan Sajana mumbai indians (PTI)

Who Is Sajeevan Sajana : महिला प्रीमियर लीग २०२४ ची धमाकेदार सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला विजयासाठी ५ धावांची गरज होती, तेव्हा सजीवन सजना हिने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

विजयी षटकार ठोकताच मुंबईच्या खेळाडूंनी तुफान जल्लोष केला. तर सजीवन संजना ही WPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात स्टार बनली.

तत्पूर्वी, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १७१ धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मुंबई संघाने दमदार सुरुवात केली, मात्र अखेरच्या षटकांमध्ये ते थोडेसे दबावात आले. पण डावाच्या शेवटच्या चेंडूवर सजीवन सजनाने षटकार ठोकत आपल्या संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला.

सजीवन सजना कोण आहे?

शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. यातील ७ धावा हरमनप्रीत कौरने केल्या. पण षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात ती झेलबाद झाली. शेवटचे षटक फिरकी गोलंदाजी एलिस कॅप्सीने टाकले.

२९ वर्षीय सजीवन सजना केरळकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळते. फिरकी अष्टपैलू खेळाडू सजीवनला पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सने तिला लिलावात १५ लाख रुपयांना विकत घेतले होते. सजीवन ही अनकॅप्ड खेळाडू आहे. केरळसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबरोबरच ती भारत अ संघाकडूनही खेळली आहे.

डब्ल्यूपीएल पदार्पणातच बनली सुपरस्टार

पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. विशेषत: जेव्हा शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी २ पेक्षा अधिक धावांची गरज असते, पण क्रिकेटमध्ये काहीही शक्य नाही, असं म्हणतात ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सजीवन सजनानेही तेच करून दाखवले. WPL 2024 च्या पहिल्या सामन्यात, सजीवन मुंबईसाठी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली आणि WPL करिअरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत मुंबई इंडियन्सला शानदार विजय मिळवून दिला.

Whats_app_banner