Who Is Sahil Chauhan : २७ चेंडूत शतक ठोकणारा साहिल चौहान कोण आहे? भारताशी काय नातं? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Who Is Sahil Chauhan : २७ चेंडूत शतक ठोकणारा साहिल चौहान कोण आहे? भारताशी काय नातं? जाणून घ्या

Who Is Sahil Chauhan : २७ चेंडूत शतक ठोकणारा साहिल चौहान कोण आहे? भारताशी काय नातं? जाणून घ्या

Jun 18, 2024 09:04 PM IST

Who Is Sahil Chauhan : साहिल चौहानने IPL २०१३ मध्ये ख्रिस गेलचे ३० चेंडूत झळकावलेले शतक मागे टाकले. पुरुषांच्या T20 सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चौहान अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

Who Is Sahil Chauhan : २७ चेंडूत शतक ठोकणारा साहिल चौहान कोण आहे? भारताशी काय नातं? जाणून घ्या
Who Is Sahil Chauhan : २७ चेंडूत शतक ठोकणारा साहिल चौहान कोण आहे? भारताशी काय नातं? जाणून घ्या

एस्टोनियन फलंदाज साहिल चौहानने २७ चेंडूत शतकी खेळी केली. यानंतर साहिल चौहान चांगलाच चर्चेत आला आहे. साहिलने एपिस्कोपी येथे यजमान सायप्रसविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या २७ चेंडूत वादळी शतक केले.

हे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील सर्वात वेगवान शतक आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने एका डावात सर्वाधिक १८ षटकार मारले. चौहानने नामिबियाच्या यान-निकोल लॉफ्टी ईटनचा सर्वात वेगवान टी-20 आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडला. यान-निकोलने नेपाळविरुद्ध ३३ चेंडूत शतक झळकावले होते. पण आता त्याचा विक्रम ४ महिन्यातच मोडित निघाला आहे.

साहिलने ख्रिस गेल, डिव्हिलियर्सला मागे टाकले

साहिल चौहानने IPL २०१३ मध्ये ख्रिस गेलचे ३० चेंडूत झळकावलेले शतक मागे टाकले. पुरुषांच्या T20 सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चौहान अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

६ सामन्यांच्या द्विपक्षीय टी-20 मालिकेच्या पहिल्या दिवशी (१७ जून) २ सामने खेळले गेले, हे दोन्ही सामने एस्टोनियाने जिंकले. सायप्रसच्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून एस्टोनियाने पहिला सामना जिंकला.

साहिलने ३५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या

विशेष म्हणजे, साहिल पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाला. पण पुढच्या सामन्यात त्याने आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले. प्रथम फलंदाजी करताना सायप्रसने ७ गडी गमावून १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ९ धावांवर एस्टोनियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर साहिल चौहान क्रीजवर आला आणि त्याने वादळ निर्माण करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. साहिल चौहानने ३५१.२१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

साहिल चौहानने एका दिवसात दोन सामने खेळले

साहिल चौहानला आंतरराष्ट्रीय T20 चा फारसा अनुभव नाही. तो आतापर्यंत फक्त ४ टी-20 खेळला आहे. त्याने ३० सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या करिअरला सुरुवात केली. या दिवशी त्याने २ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, तर आता त्याला एकूण ४ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. या शतकापूर्वी त्याच्या खात्यात केवळ १८ धावा होत्या, मात्र आता तो जगभर प्रसिद्ध झाला आहे.

ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यापूर्वी तो शून्यावर बाद झाला

युनिव्हर्स बॉसचा विक्रम मोडण्यापूर्वी साहिल त्याच्या कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. मात्र, आता त्याने त्याची भरपाई केली आहे. साहिलबद्दल त्याचे प्रशिक्षक रिचर्ड कॉक्स म्हणतात, की तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकू शकतो. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे तो भारतीय वंशाचा खेळाडू असल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतकं

साहिल चौहान : सायप्रसविरुद्ध २७ चेंडू

जॉन-निकोल लॉफ्टी ईटन: नेपाळविरुद्ध ३३ चेंडू

कुशल मल्ला : मंगोलियाविरुद्ध ३४ चेंडू

डेव्हिड मिलर: बांगलादेशविरुद्ध ३५ चेंडू

रोहित शर्मा: श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडू

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार

साहिल चौहान : सायप्रसविरुद्ध १८ षटकार

हजरतुल्ला झाझाई : आयर्लंडविरुद्ध १६ षटकार

फिन ऍलन : पाकिस्तानविरुद्ध १६ षटकार

झीशान कुकीखेल : हंगेरीविरुद्ध १५ षटकार

ॲरॉन फिंच : इंग्लंडविरुद्ध १४ षटकार

Whats_app_banner