ऑस्ट्रेलियन संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट याने टॉप-३ यष्टीरक्षक फलंदाजांची नावे जाहीर केली आहेत. गिलख्रिस्टने यात एमएस धोनीचेही नाव घेतले, परंतु तो धोनीचा नंबर खाली आहे.
गिलख्रिस्टच्या मते, ऑस्ट्रेलियन विकेटकीपर रॉडनी मार्श हा धोनीपेक्षा उत्तम विकेटकीपर होता. ॲडम गिलख्रिस्टने नंबर वन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रॉडनी मार्शची निवड केली आहे.
खरं तर, ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट एका वृत्तपत्राशाी बोलताना म्हणाला की रॉडनी मार्श हा त्याचा आदर्श आहे. यावेळी गिलीने धोनीच्या संयमाचीही प्रशंसा केली. रॉडनी मार्शने १९७० ते १९८४ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी एकूण ९६ कसोटी सामने खेळले.
यानंतर गिलीने आपल्या यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराचाही समावेश केला आहे. ॲडम गिलख्रिस्ट पुढे म्हणाला, की त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीत तो हुशार होता, फलंदाजीत वरच्या क्रमांकावर यायचा, तसेच कीपिंगमध्येही तो उत्कृष्ट होता.
दरम्यान, यावेळी ॲडम गिलख्रिस्टने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबतही भाष्य केले. ऑस्ट्रेलिया ही मालिका जिंकेल असे भाकीतही गिलीने केले आहे.
भारताने ऑस्ट्रेलियातील दोन्ही देशांमधील शेवटच्या दोन कसोटी मालिका जिंकल्या असून आता हॅट्ट्रिककडे लक्ष आहे.
ऑस्ट्रेलियाने २०१४-१५ मध्ये भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २-० ने जिंकली होती, परंतु त्यानंतर सलग ४ मालिका गमावल्या आहेत. यापैकी दोन पराभव घरच्या मैदानावर झाले आहेत. २०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या संघाविरुद्ध आणि २०२०-२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या संघाविरुद्ध.
२०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर दिली होती, पण यानंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जिंकली होती.