Richest Cricketer : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? धोनी-विराट खूप मागे, संपत्ती किती? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Richest Cricketer : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? धोनी-विराट खूप मागे, संपत्ती किती? जाणून घ्या

Richest Cricketer : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? धोनी-विराट खूप मागे, संपत्ती किती? जाणून घ्या

Published Aug 25, 2024 06:48 PM IST

कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा एवढ्या मोठ्या व्यावसायिक घराण्यातील असूनही त्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे.

Richest Cricketer : ७० हजार कोटींचा मालक… जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? धोनी-विराट खूप मागे
Richest Cricketer : ७० हजार कोटींचा मालक… जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? धोनी-विराट खूप मागे

क्रिकेटमधील पैसा दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी क्रिकेटपटूंची कमाई खूप कमी असायची, पण आता जवळपास प्रत्येक क्रिकेटपटू कोट्यवधी रुपये कमावतो. भारतीय देशांतर्गत क्रिकेटपटू अनेक परदेशी क्रिकेटपटूंपेक्षा जास्त पैसा कमावतात.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना मोठी रक्कम देते. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, धोनी आणि कोहलीपेक्षाही श्रीमंत क्रिकेटर भारतात आहे.

आम्ही तुम्हाला एका अशा भारतीय क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत जो एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे.

होय, आपण कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला बद्दल बोलत आहोत. आर्यमन बिर्ला हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे.

कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा एवढ्या मोठ्या व्यावसायिक घराण्यातील असूनही त्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे.

आपल्या मेहनतीने त्याने क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले. तो मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असे. मात्र, २०१९ नंतर त्याने क्रिकेटमधून अचानक ब्रेक घेतला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याने हा ब्रेक घेतला. मानसिक आरोग्याचे कारण देत आर्यमनने क्रिकेट सोडल्याचे बोलले जाते.

आर्यमन बिर्लाची संपत्ती किती?

सुत्रांच्या माहितीनुसार, कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा जवळपास ७०,००० कोटी रुपयांचा मालक असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे.

आर्यमन बिर्लाची क्रिकेट कारकीर्द कशी होती?

आर्यमन बिर्ला याने २०१७ मध्ये मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो २०१९ पर्यंत क्रिकेट खेळला. या काळात आर्यमनने ९ प्रथम श्रेणी आणि ४ लिस्ट-ए सामने खेळले. प्रथम श्रेणी सामन्यांच्या १६ डावांमध्ये, त्याने २७.६० च्या सरासरीने ४१४ धावा केल्या, ज्यामध्ये उच्च स्कोअर १०३* धावा होता. याशिवाय आर्यमनने लिस्ट-ए च्या ३ डावात एकूण ३६ धावा केल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या