Who Is Priyansh Arya : प्रियांश आर्या कसा घडला? शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी एका अटीवर क्रिकेटची परवानगी दिली, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Who Is Priyansh Arya : प्रियांश आर्या कसा घडला? शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी एका अटीवर क्रिकेटची परवानगी दिली, पाहा

Who Is Priyansh Arya : प्रियांश आर्या कसा घडला? शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी एका अटीवर क्रिकेटची परवानगी दिली, पाहा

Published Apr 09, 2025 03:39 PM IST

Who Is Priyansh Arya : दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात प्रियांश आर्याने दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना १० डावात ६०८ धावा केल्या. त्याने स्पर्धेत २ शतके आणि ४ अर्धशतके केली.

Who Is Priyansh Arya : प्रियांश आर्या कसा घडला? शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी एका अटीवर क्रिकेटची परवानगी दिली, पाहा
Who Is Priyansh Arya : प्रियांश आर्या कसा घडला? शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी एका अटीवर क्रिकेटची परवानगी दिली, पाहा

पंजाब किंग्जचा युवा खेळाडू प्रियांश आर्या सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याने सीएसकेविरुद्ध शतक ठोकून खळबळ माजवली आहे. प्रत्येकजण त्याच्याबद्दल बोलत आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने ८३ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर प्रियांश आर्याने ही शतकी खेळी खेळली. प्रियांश आर्यने ४२ चेंडूत १०३ धावांच्या खेळीत ९ षटकार आणि ७ चौकार मारले. 

आयपीएल २०२४ च्या लिलावातही प्रियांश आर्यने आपले नाव दिले होते, परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. गेल्या वर्षी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात ६ षटकार मारल्यानंतर प्रियांश प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर त्याला या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने ३.८० कोटी रुपयांना खरेदी केले.

प्रियांश आर्यने वयाच्या ७ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. संजय भारद्वाज यांच्या प्रशिक्षणाखाली त्याने क्रिकेटचे धडे घेतले. २०२३-२४ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने २२२ धावा केल्या, तो दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

प्रियांश आर्य याचे वैयक्तिक आयुष्य

प्रियांश आर्याची जन्मतारीख - १८ जानेवारी २००१ 

वय- २४ वर्षे

जन्मस्थान- दिल्ली

शिक्षण- कुलाची हंसराज मॉडेल स्कूल, स्वामी श्रद्धानंद महाविद्यालय

छंद- बॅडमिंटन, स्नूकर खेळणे, प्रवास करणे

आवडता क्रिकेटपटू - गौतम गंभीर

प्रियांश आर्यचे कुटुंब

वडील- पवन आर्य (शिक्षक)

आई- राधा बाला आर्य (शिक्षिका)

प्रियांश आर्य एकदा म्हणाला होता, की जर तो क्रिकेटपटू झाला नसता तर तो त्याच्या पालकांसारखा शिक्षक झाला असता. विशेष म्हणजे, जेव्हा त्याने त्याच्या पालकांना सांगितले, की त्याला क्रिकेटर व्हायचे आहे. तेव्हा त्याच्या पालकांनी एक अट घातली की त्याला खेळासोबत अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष द्यावे लागेल, तरच ते परवानगी देतील.

प्रियांश आर्यने डीपीएलमध्ये शानदार कामगिरी 

दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात प्रियांश आर्याने दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना १० डावात ६०८ धावा केल्या. त्याने स्पर्धेत २ शतके आणि ४ अर्धशतके केली. यादरम्यान एका सामन्यात त्याने एका षटकात ६ षटकार मारले.

प्रियांश आर्य आयपीएल २०२५ मध्ये

प्रियांश आर्यने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये १५८ धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात ४७ धावा केल्या, ज्यामध्ये पंजाबने अहमदाबादमध्ये गुजरातचा पराभव केला. राजस्थानविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १०३ धावांची शानदार खेळी केली.

प्रियांश आर्यची क्रिकेट कारकीर्द

प्रियांश आर्य- सलामीवीर फलंदाज

फलंदाजीची शैली - डावखुरा फलंदाज

गोलंदाजीची शैली - उजव्या हाताने ऑफब्रेक

प्रियांश आर्यने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्याने ७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ७७ धावा केल्या आहेत. त्याने २२ टी-२० सामन्यांमध्ये ७३१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने २ शतके आणि ३ अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या