मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Prakhar Chaturvedi : भारताचा 'ब्रायन लारा' प्रखर चतुर्वेदी कोण आहे? एकट्याने ४०४ धावा करून इतिहास रचला

Prakhar Chaturvedi : भारताचा 'ब्रायन लारा' प्रखर चतुर्वेदी कोण आहे? एकट्याने ४०४ धावा करून इतिहास रचला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 10:23 PM IST

Who Is Prakhar Chaturvedi : कर्नाटकाच्या प्रखर चतुर्वेदीने आज इतिहास इतिहास रचला आहे. कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध नाबाद ४०४ धावांची अविश्वसनीय इनिंग खेळली आहे.

Who Is Prakhar Chaturvedi 400 runs
Who Is Prakhar Chaturvedi 400 runs (PTI)

देशांतर्गत क्रिकेट असो अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, एखाद्या फलंदाजाने ४०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या, असे आपण जेव्हा ऐकतो. तेव्हा आपल्या मनात केवळ एकाच फलंदाजाचे नाव येते. ते नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा सुपरस्टा फलंदाज ब्रायन चार्ल्स लारा. लाराने इंग्लंडविरुद्ध कसोटीत ४०० धावांची खेळी केली होती.

मात्र, आता भारतीय लोकांच्या मनात ब्रायन लाराचे हे एकच नाव येणार नाही. आता जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज ४०० किंवा त्याहून अधिक धावा करेल, तेव्हा लारासोबत एका भारतीय फलंदाजाच्या नावाचीही चर्चा होईल. हे नाव म्हणजे प्रखर चतुर्वेदी.

होय, कर्नाटकाच्या प्रखर चतुर्वेदीने आज इतिहास इतिहास रचला आहे. कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध नाबाद ४०४ धावांची अविश्वसनीय इनिंग खेळली आहे. 

सलामीवीर फलंदाज प्रखर चतुर्वेदी हा कोणत्याही स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. प्रखरने ६३८ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४०४ धावांची अप्रतिम खेळी खेळली, यामध्ये ४६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कर्नाटकने कर्नाटकने ८ बाद ८९० धावा करून डाव घोषित केला. यामुळे सामना अनिर्णित राहिला.

४०४ धावा करणारा प्रखर चतुर्वेदी कोण आहे?

प्रखर चतुर्वेदी हा कर्नाटकचा सलामीवीर आहे. प्रखरचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तर त्याची आई डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहे.

विशेष म्हणजे, माजी भारतीय खेळाडू राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड आणि प्रखर एकाच संघात खेळतात. इतकेच नाही तर प्रखर आणि समित दोघेही कूचबिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये एकत्र खेळत होते. या सामन्यात समित द्रविड फारसा प्रभाव पाडू शकला नाही. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात समित २२ धावा करून बाद झाला.

प्रखरची ४०४ धावांची धावसंख्या ही कूचबिहार ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी विजय झोलने या स्पर्धेत ४५१ धावांची खेळी केली होती. 

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi