Sana Javed : सना जावेद कोण आहे? जिच्यासोबत शोएब मलिकनं सुरू केली तिसरी इनिंग
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sana Javed : सना जावेद कोण आहे? जिच्यासोबत शोएब मलिकनं सुरू केली तिसरी इनिंग

Sana Javed : सना जावेद कोण आहे? जिच्यासोबत शोएब मलिकनं सुरू केली तिसरी इनिंग

Jan 20, 2024 01:15 PM IST

Who Is Sana Javed : शोएब मलिका क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो अनेक वर्षांपासून पाकिस्तानसाठी खेळत आहे.

Shoaib Malik Sana Javed
Shoaib Malik Sana Javed

Shoaib Malik Sana Javed  : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. शोएब आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटांच्या बातम्या येत असतानाच शोएब मलिकने आपला निकाह उरकला आहे.

क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एका खासगी सोहळ्यात लग्न केले.

सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी

यानंतर आता सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी बनली आहे. सना जावेदच्या आधी शोएबने २०१० मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले होते. तेव्हा शोएबची पहिली पत्नी आयशा सिद्दीकी पुढे आली होती. सानियासोबतच्या लग्नाच्या वेळी शोएब मलिकने त्याची पहिली पत्नी आयशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचे नाकारले होते, परंतु हे प्रकरण पुढे गेल्यावर शोएबने आयशाला घटस्फोट दिला.

दरम्यान, शोएब मलिका क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो अनेक वर्षांपासून पाकिस्तानसाठी खेळत आहे. तसेच, अनेक क्रिकेट लीगमध्येही तो खेळताना दिसून येतो. पण सना जावेद कोण आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

सना जावेद कोण आहे?

सना जावेद हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. सना जावेदने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सनाने २०१२ मध्ये शहर-ए-जात या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर सना जावेदला २०१३ मध्ये प्यारे अफजल मधून खरी प्रसिद्धी मिळाली. खानी या रोमँटिक ड्रामामध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर सना जावेदला लक्स स्टाईल पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.

विशेष म्हणजे, सना जावेदचे याआधी एक लग्न झाले होते. पण काही वर्षातच तिचा घटस्फोट झाला. तिने २०२० मध्ये गायक उमेर जसवालशी लग्न केले होते. मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले. २८ वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

शोएब मलिकचे क्रिकेट करियर

४१ वर्षीय शोएब मलिकच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २८७ एकदिवसीय सामन्यांच्या २५८ डावांमध्ये ७५३४ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, शोएब मलिकने ३५ कसोटी सामन्यांमध्ये १८९८ धावा केल्या आहेत. कसोटीत शोएब मलिकने ३ शतके आणि ८ अर्धशतके केली आहेत.

Whats_app_banner