यंदाच्या IPL मध्ये सर्वात ‘म्हातारा’ खेळाडू धोनी, तर केकेआरच्या संघात सर्वात युवा खेळाडू, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  यंदाच्या IPL मध्ये सर्वात ‘म्हातारा’ खेळाडू धोनी, तर केकेआरच्या संघात सर्वात युवा खेळाडू, पाहा

यंदाच्या IPL मध्ये सर्वात ‘म्हातारा’ खेळाडू धोनी, तर केकेआरच्या संघात सर्वात युवा खेळाडू, पाहा

Mar 11, 2024 01:11 PM IST

IPL 2024 Oldest And Youngest Player : आयपीएल २०२४ मध्ये सर्वात वयस्कर खेळाडू आणि सर्वात युवा खेळाडू कोण आहे? हे तुम्हाला माहीत आहे का? धोनी हा आयपीएल २०२४ चा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

IPL 2024 Oldest And Youngest Player यंदाच्या IPL मध्ये सर्वात ‘म्हातारा’ खेळाडू धोनी, तर केकेआरच्या संघात सर्वात युवा खेळाडू, पाहा
IPL 2024 Oldest And Youngest Player यंदाच्या IPL मध्ये सर्वात ‘म्हातारा’ खेळाडू धोनी, तर केकेआरच्या संघात सर्वात युवा खेळाडू, पाहा

आगामी आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.

आयपीएल स्पर्धा युवा खेळाडूंसाठी वरदान ठरली आहे. आता या स्पर्धेतूनच भविष्यातील स्टार खेळाडू उदयास येत आहे. रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल ही नावे आयपीएलमधूनच मोठी झाली आणि आता टीम इंडियासाठी खेळताना दिसत आहेत.

दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये सर्वात वयस्कर खेळाडू आणि सर्वात युवा खेळाडू कोण आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

यंदाच्या आयपीएलमधीस चा सर्वात अनुभवी खेळाडू

आयपीएलमध्ये बरेच खेळाडू असे आहेत, जे पहिल्या मोसमापासून आयपीएल खेळत आहेत. यापैकी एक नाव टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आहे. धोनी सध्या ४२ वर्षांचा आहे आणि पहिल्या मोसमापासून तो इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे. 

या प्रदीर्घ प्रवासात त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला ५ वेळा आयपीएलचा चॅम्पियन बनवले आहे.

धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

आयपीएल २०२४ चा सर्वात युवा खेळाडू कोण?

आयपीएल २०२४ चा सर्वात युवा खेळाडू अंगक्रिश रघुवंशी आहे. १९ वर्षांचा अंगरकीश रघुवंशी याचा जन्म ५ जून २००५ रोजी दिल्ली येथे झाला. २०२४ च्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २० लाख रुपयांना विकत घेतले. 

२०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान आंगक्रिश प्रसिद्धीच्या झोतात आला होता. २०२२ च्या विश्वचषकात त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यावेळी आंगक्रिशने ६ सामन्यात ४६.३३ च्या सरासरीने २७८ धावा केल्या, ज्यात १ शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता.

Whats_app_banner