मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  १२ सामन्यात ३० षटकार, १९२ चा स्ट्राइक रेट… मुंबई इंडियन्सचा नवा स्टार नमन धीर कोण आहे?

१२ सामन्यात ३० षटकार, १९२ चा स्ट्राइक रेट… मुंबई इंडियन्सचा नवा स्टार नमन धीर कोण आहे?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2024 01:46 PM IST

Naman Dhir T20 Career Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने नमन धीरला २० लाख रुपयांना विकत घेतले आहे. तो मैदानावर मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. नमन धीरच्या कारकिर्दीतील हा सहावा टी-२० सामना होता.

Naman Dhir T20 Career Mumbai Indians १२ सामन्यात ३० षटकार, १९२ चा स्ट्राइक रेट मुंबई इंडियन्सचा नवा स्टार नमन धीर कोण आहे?
Naman Dhir T20 Career Mumbai Indians १२ सामन्यात ३० षटकार, १९२ चा स्ट्राइक रेट मुंबई इंडियन्सचा नवा स्टार नमन धीर कोण आहे? (AFP)

Who is Naman Dhir : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. त्यांना गुजरात टायटन्सने अवघ्या ६ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्सला शेवटच्या ५ षटकांमध्ये ४२ धावांची गरज होती, मात्र मुंबईच्या फलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यांना ६ कमी पडल्या. 

या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने युवा फलंदाज नमन धीरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. नमन धीर संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने काही चांगले फटके खेळले, मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही.

फलंदाजीत दाखवला दम

नमन धीर हा अवघा २४ वर्षांचा असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून त्याने दाखवून दिले आहे की तो लंबी रेसचा घोडा आहे. गुजरातचा गोलंदाज अजमतुल्ला उमरझाईच्या षटकात नमनने तुफानी फलंदाजी केली. या षटकात त्याने ३ चौकार मारले आणि त्यानंतर त्याने एक षटकार मारला. मात्र या षटकातील शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने १० चेंडूत २० धावा केल्या.

नमन धीरने आतापर्यंत फक्त ६ टी-20 सामने खेळले 

मुंबई इंडियन्सने नमन धीरला २० लाख रुपयांना विकत घेतले आहे. तो मैदानावर मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. नमन धीरच्या कारकिर्दीतील हा सहावा टी-२० सामना होता. त्याने अद्याप देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५० षटकांचा सामना खेळलेला नाही. मात्र प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर दोन शतके आहेत. त्याने १४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५७४ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

शेर-ए-पंजाब T20 कपमध्ये दोन शतके झळकावली

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या शेर-ए-पंजाब टी-20 चषकात तो त्याच्या फटकेबाजीमुळे सर्वांच्या नजरेत आला होता. त्या स्पर्धेत त्याने १२ डावात १९२.५६ च्या स्ट्राईक रेटने आणि ४२.३६ च्या सरासरीने ४६६ धावा केल्या. यात त्याने दोन शतके ठोकली आणि एकूण ३० षटकारही ठोकले. त्याने अधिकतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

IPL_Entry_Point