Mayank Yadav : भारताचा ब्रेट ली मयंक यादव कोण आहे? IPL सॅलरी किती; देशांतर्गत क्रिकेट कोणाकडून खेळतो? पाहा-who is mayank yadav lsg bowler who bowled fastest ball of ipl 2024 mayank yadav ipl salary cricket stats records career ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mayank Yadav : भारताचा ब्रेट ली मयंक यादव कोण आहे? IPL सॅलरी किती; देशांतर्गत क्रिकेट कोणाकडून खेळतो? पाहा

Mayank Yadav : भारताचा ब्रेट ली मयंक यादव कोण आहे? IPL सॅलरी किती; देशांतर्गत क्रिकेट कोणाकडून खेळतो? पाहा

Mar 31, 2024 10:55 AM IST

Who Is Mayank Yadav : मयंक यादवने ४ षटकात २७ धावा देत ३ बळी घेतले आणि तो सामनावीर ठरला. पदार्पणाच्या सामन्यात तुफानी गोलंदाजी करणारा मयंक आता चांगलाच चर्चेत आला आहे.

who is mayank yadav LSG bowler मयंक यादव कोण आहे?
who is mayank yadav LSG bowler मयंक यादव कोण आहे? (AFP)

Mayank Yadav Bowling Highlights : आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी (३१ मार्च) लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात लखनौने २१ धावांनी विजय मिळवला. लखनौच्या या विजयाचा हिरो २१ वर्षीय मयंक यादव ठरला.

मयंक यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मयंकने या सामन्यात १५० हून अधिकच्या स्पीडने गोलंदाजी केली. त्याने १५५.८ च्या स्पीडने चेंडू टाकला, हा IPL २०२४ चा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.

सर्वात स्लो चेंडू ताशी १४१ किमीचा

मयंक यादवने ४ षटकात २७ धावा देत ३ बळी घेतले आणि तो सामनावीर ठरला. पदार्पणाच्या सामन्यात तुफानी गोलंदाजी करणारा मयंक आता चांगलाच चर्चेत आला आहे. मयंकने पहिल्याच षटकात आपल्या वेगानं खळबळ माजवली. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला चेंडू १४७ च्या वेगाने टाकला. यानंतर, त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये १५० किंवा त्याहून अधिकच्या स्पीडने ९ चेंडू टाकले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याचा सर्वात स्लो चेंडू ताशी १४१ किमीचा होता.

जॉनी बेयरस्टॉ पहिली विकेट

संघाला विकेट्सची नितांत गरज असताना मयंकने जॉनी बेअरस्टोला बाद करत पहिली विकेट घेतली. यानंतर त्याने प्रभासिमरनला बाद करून सामन्यात खळबळ उडवून दिली. जितेश शर्माला बाद करत मयंकने तिसरी विकेट घेतली.

मयंक यादव कोण आहे?

मयंक यादवचा जन्म १७ जून २००२ रोजी दिल्लीत झाला. मयंक दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मयंकने दिल्लीच्या सोनेट क्लबमधून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. ही तीच अकादमी आहे जिथून भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंत, शिखर धवन आणि आशिष नेहरासारखे क्रिकेटपटू उदयास आले आहेत.

मयंक यादवच्या देशांतर्गत कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत एक प्रथम श्रेणी सामना, १७ लिस्ट-ए आणि १० टी-20 सामने खेळले आहेत. मयंकने १७ लिस्ट ए मॅचमध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत तर १० टी-20 मॅचमध्ये १२ विकेट घेतल्या आहेत.

लखनौने मयंकला २० लाखात खरेदी केले

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ च्या लिलावादरम्यान मयंक यादवचा त्यांच्या संघात समावेश केला होता. मयंक यादव २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्याला मूळ किंमतीवरच खरेदी केले होते.

पण यानंतर तो दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला होता. त्याच्या जागी अर्पित गुलेलियाचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी मयंकने या मोसमात पुनरागमन केले आणि पदार्पणाच्या सामन्यातच तो स्टार झाला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मयंक यादवची कामगिरी

गेल्या वर्षी झालेल्या २३ वर्षांखालील कर्नल सीके नायडू स्पर्धेत मयंकने दमदार कामगिरी केली होती. मयंकने केवळ ६ सामन्यात १५ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये त्याने छत्तीसगडविरुद्ध एकाच सामन्यात ५ विकेट घेतल्या. याशिवाय त्याने बॅटिंगमध्ये ६६ धावांचे योगदान दिले.

मयंकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२४ मध्येही प्रभावी कामगिरी केली. मयंकने या स्पर्धेतील ४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ५ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. देवधर ट्रॉफी २०२३ मध्ये उत्तर विभागाकडून खेळताना मयंकने ५ सामन्यांत १२ विकेट घेतल्या.

Whats_app_banner