मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Who Is love Khaani : बाबर नाही विराट आवडतो! ही पाकिस्तानी क्यूट गर्ल आहे तरी कोण? पाहा

Who Is love Khaani : बाबर नाही विराट आवडतो! ही पाकिस्तानी क्यूट गर्ल आहे तरी कोण? पाहा

Sep 03, 2023 09:37 PM IST

virat kohli ind vs pak wicket : विराटची विकेट पडल्यानंतर कोट्यवधी चाहत्यांची निराशा झाली. या चाहत्यांमध्ये पाकिस्तानी चाहत्यांचाही समावेश होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेली एक पाकिस्तानी महिला फॅन खूपच निराश झालेली दिसली.

Who Is love Khaani
Who Is love Khaani

Who Is love Khaani ind vs pak : आशिया कपचा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्या खेळला गेला. पण भारताच्या डावानंतर पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

ट्रेंडिंग न्यूज

तत्पूर्वी, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. कारण पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताचे टॉप चार फलंदाज एकामागे एक तंबूत पाठवले. या दरम्यान शाहीन आफ्रिदीने आधी रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर आपल्या पुढच्या षटकात शाहीनने विराट कोहलीचीही शिकार केली.

विराटची विकेट पडल्यानंतर कोट्यवधी चाहत्यांची निराशा झाली. या चाहत्यांमध्ये पाकिस्तानी चाहत्यांचाही समावेश होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेली एक पाकिस्तानी महिला फॅन खूपच निराश झालेली दिसली. यानंतर जेव्हा पावसामुळे सामना रद्द झाला आणि ती मुलगी मैदानाबाहेर आली तेव्हा, तिने विराटच्या विकेटवर आपली प्रतिक्रिया दिली. ती पाकिस्तानी महिला फॅन विराटची खूप मोठी चाहती असल्याचे सांगते. सध्या ही फॅन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, व्हायरल झालेली विराटची महिला फॅन नेमकी आहे तरी कोण हे तुम्हाला माहीत आहे का?

विराटची फॅन व्हायरल फॅन कोण आहे?

विराट कोहलीची ही फॅन सध्या UAE मध्ये राहते. तर या व्हायरल मुलीचे नाव लव खानी आहे. तो सोशल मीडिया स्टार आहे. लव खाणी टी-20 वर्ल्डकपमध्येही भारत आणि पाकिस्तान सामन्यात दिसली होती. विशेष म्हणजे त्यावेळी तिने एका गालावर पाकिस्तानचा झेंडा तर दुसऱ्या गालावर भारताचा झेंडा रंगवलेला होता.

Who Is love Khaani
Who Is love Khaani

स्टेडियमध्ये हिंदी गाण्यांवर रील्स बनवते

लव खाणीच्या बहुतेक रील्स आणि TikTok पोस्टमध्ये भारतीय गाणी आहेत. ती स्टेडियममधून भारतीय गाण्यांवर रील्स बनवते. विशेष म्हणजे लव खाणीने विराट कोहलीवरही अनेक रिल्स आणि टिकटॉक व्हिडीओ बनवले आहेत.

विराट कोहली बाद झाल्यानंतर लव खाणी काय म्हणाली?

कोहली लवकर आऊट झाल्याबद्दल लवने निराशा व्यक्त केली. ती म्हणाली की, "मी फक्त विराटला पाहायला आले होते. मला त्याचे शतक पाहायचे होते, पण तो लवकर बाद झाला. मला तो खूप आवडतो. यावर बाबर आणि कोहली यांच्यामध्ये ती कोणाची निवड करणार, असे विचारले असता तिने कोहलीचे नाव घेतले. यावर शेजारी उभी असलेली एक पाकिस्तानी व्यक्ती काहीतरी बोलते, पण तेवढ्यात लव म्हणजे, शेजाऱ्यांवर प्रेम करणे वाईट आहे का?

WhatsApp channel