kamran ghulam : कोण आहे कामरान गुलाम? बाबरच्या जागी संघात आला आणि पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  kamran ghulam : कोण आहे कामरान गुलाम? बाबरच्या जागी संघात आला आणि पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं!

kamran ghulam : कोण आहे कामरान गुलाम? बाबरच्या जागी संघात आला आणि पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं!

Published Oct 16, 2024 01:52 PM IST

Pak vs eng multan, kamran ghulam centruy : पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. अशा परिस्थितीत स्टार फलंदाज बाबर आझमच्या जागी २९ वर्षीय कामरान गुलाम याला दुसऱ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली.

Kamran Ghulam : कामरान गुलाम कोण आहे? बाबरच्या जागी संघात आला, पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं
Kamran Ghulam : कामरान गुलाम कोण आहे? बाबरच्या जागी संघात आला, पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मुल्तान येथे खेळला जात आहे. या सामन्याचा आज (१६ ऑक्टोबर) दुसरा दिवस असून पाकिस्तानी संघ फलंदाजी करत आहे.

दरम्यान, या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाने कठोर पावले उचलत एक धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी स्टार फलंदाज बाबर आझम याची संघातून हकालपट्टी केली. या निर्णयानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. अशा परिस्थितीत स्टार फलंदाज बाबर आझमच्या जागी २९ वर्षीय कामरान गुलाम याला दुसऱ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली.

कामरान गुलाम याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून आपली निवड सार्थकी लावली. बाबर आझमच्या वाढदिवशी गुलामने शतक झळकावले हे विशेष.

कामरान गुलाम याचा प्रवास सोपा नव्हता

२९ वर्षीय कामरान गुलामसाठी कसोटी पदार्पण अजिबात सोपे नव्हते. त्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. २०१३/१४ हंगामात कायदे-ए-आझम ट्रॉफीमध्ये त्याने अबोटाबादसाठी पदार्पण केले. या पदार्पणापासूनच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा होता. मात्र, लिस्ट ए आणि टी-२० मध्ये त्याचा रेकॉर्ड काही खास नव्हता.

देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

कामरान गुलामच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे तर तो ५९ सामने खेळला आहे. या काळात त्याने ९८ डावांमध्ये ४९.१७ च्या सरासरीने आणि ५३.०४ च्या स्ट्राईक रेटने ४३७७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २० अर्धशतके आणि १६ शतके झळकावली आहेत.

या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १६६ आहे. कामरानने गोलंदाजीतही हात आजमावला आहे. या अष्टपैलू खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २८ विकेट्सही घेतल्या आहेत.

लिस्ट ए मधील कामरान गुलामची आकडेवारी

कामरान गुलामने ९४ लिस्ट ए सामन्यांच्या ९१ डावांमध्ये ३३४४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ४२.३२ आणि स्ट्राइक रेट ८६.८५ होता. या फॉरमॅटमध्ये त्याने २० अर्धशतके आणि ८ शतके झळकावली आहेत. नाबाद १२३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एवढेच नाही तर त्याच्या नावावर ६४ डावात ६८ विकेट्स आहेत.

कामरान गुलामने ७३ टी-20 सामन्यांच्या ६१ डावांमध्ये ८ अर्धशतके आणि १ शतकाच्या मदतीने १५१० धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ३२ विकेट्स आहेत.

Babar Azam's post on Kamran Ghulam
Babar Azam's post on Kamran Ghulam

बाबर खराब फॉर्मशी झुंजत होता

बाबर आझम कसोटीत खराब फॉर्मशी झगडत आहे. अशा स्थितीत त्याला संघातून वगळण्यात आले. रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर टीका केली होती. बाबर आझम यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, कामरान गुलामने रमीझ राजाला चुकीचे सिद्ध केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या