एक दिवस आधी, त्याने पदार्पण केल्यापासून सलग ८ कसोटी डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करून विश्वविक्रम केला होता, जो १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात यापूर्वी घडला नव्हता.
कामिंडू मेंडिसने तिसऱ्या दिवशी शतकी खेळी करत अनेक मोठे यश आपल्या नावावर केले. जागतिक क्रिकेटमध्ये मेंडिसची चर्चा जोरात सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने नाबाद १८२ धावा केल्या. श्रीलंकेतने ६०२ धावांवर त्यांचा डाव घोषित केला.
गॉल येथे जन्म- ३० सप्टेंबर १९९८ रोजी गॉल येथे जन्मलेल्या कामिंडू मेंडिसने जुलै २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॉल येथे कसोटी पदार्पण केले. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ६१ धावा करून त्याने आपली वेळ येत असल्याचे दाखवून दिले होते. या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही.
यजमान श्रीलंकेने ही कसोटी एक डाव आणि ३९ धावांनी जिंकली होती. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि तो सतत एकामागून एक विक्रम करत आहे.
कामिंदू मेंडिसने भारताविरुद्ध दोन्ही हातांनी गोलंदाजी केली - २५ वर्षीय कामिंदू मेंडिस हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. तो उजव्या आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. या वर्षी जुलैमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कामिंडूने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती.
मेंडिसचा हा पराक्रम बघून जगभरात त्याला प्रसिद्धी मिळाली. मात्र, याआधीही श्रीलंकेच्या हसन तिलकरत्ने याने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती. कामिंडू हा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो.
कामिंदू मेंडिसची आतापर्यंतची कारकीर्द- कामिंडू मेंडिसने गाले येथील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ८ कसोटी सामन्यांमच्या १३ डावात १ हजारांहून अधिक धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ५ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. कामिंदू मेंडिसने ९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १९० धावा केल्या आहेत ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५७ आहे.