Who Is Isa Guha : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॉमेंट्री करताना इसा गुहा हिने जसप्रीत बुमराहसाठी एक शब्द वापरला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
खरं तर, इंग्लिश महिला समालोचक इसा गुहा हिने दुसऱ्या दिवशी कॉमेंट्री करताना 'प्राइमेट' म्हणजे असा शब्द वापरला होता. या शब्दाचा अर्थ ' मोठ्या बुद्धीचा माकड' असा होतो.
जसप्रीत बुमराह याच्यावरील या वांशिक वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. बुमराह सध्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ६ बळी घेतले आहेत.
या वर्णभेदी कमेंटमुळे आता 'मंकी गेट स्कँडल' पुन्हा चर्चेत आले आहे. हे प्रकरण हरभज सिंग आणि अँण्ड्रू सायमंड्स यांच्यात झाला होते.
कॉमेंट्री करताना ईसा म्हणाली होती की, "बुमराह हा संघाचा एमव्हीपी आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट जसप्रीत बुमराह. तो भारतासाठी सर्वात प्रभावी ठरला आहे. या कसोटी सामन्यासाठी त्याच्यावर इतका फोकस का आहे?"
दरम्यान, या कमेंटबद्दल इसा गुहाने माफी मागितली आहे. पण 'प्राइमेट' या शब्दामुळे ती खूप चर्चेत आली आहे.
ईसा गुहा अनेक वर्षांपासून टीव्ही समालोचक आणि रेडिओ ब्रॉडकास्टर म्हणून काम करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ती माजी क्रिकेटरदेखील आहे आणि तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडसाठी १०० हून अधिक सामने खेळले आहेत.
ती बहुतेक वेळा कसोटी सामन्यांमध्ये समालोचन करताना दिसते आणि जगातील अनेक शीर्ष वेबसाइट्ससाठी स्तंभ लिहिते. खरे तर तिने २०१२ मध्ये लेखन आणि कॉमेंट्री करण्याचे काम सुरू केले.
ईसा गुहा मूळ भारतीय आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारी ती भारतीय वंशाची पहिली महिला खेळाडू आहे. ईसाचे आई-वडील काही वर्षांपूर्वी कोलकाताहून युनायटेड किंग्डममध्ये शिफ्ट झाले होते.
ईसा गुहाचा जन्म मे १९८५ मध्ये बकिंगहॅमशायर येथे झाला. तिने वयाच्या ८ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि लहानपणी ती तिच्या मोठ्या भावासोबत सराव करत असे.
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तिची इंग्लंडच्या डेव्हलपमेंट संघात निवड झाली. ईसा गुहा हिची एकूण संपत्ती १२.६ कोटी रुपये आहे. तिने २०१८ साली प्रसिद्ध गायक रिचर्ड थॉमससोबत लग्न केले.
इसा गुहा उजव्या हाताची वेगवान गोलंदाजी होती आणि २००१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी तिने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मार्च २०१२ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी तिने ८३ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने ८३ एकदिवसीय सामन्यात १०१ विकेट्स आणि २२ टी-20 सामन्यात १८ बळी घेतले. याशिवाय ईसा गुहाने ८ कसोटी खेळताना २९ विकेट घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या