मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारताकडून वर्ल्डकप हिसकावणारा हरजस सिंग कोण आहे? वडील बॉक्सिंग तर आई लांब उडीत चॅम्पियन, पाहा

भारताकडून वर्ल्डकप हिसकावणारा हरजस सिंग कोण आहे? वडील बॉक्सिंग तर आई लांब उडीत चॅम्पियन, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 12, 2024 09:09 PM IST

Harjas Singh U19 WC Final : अंडर १९ वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारतीय वंशाच्या हरजस सिंगने सर्वाधिक धावा केल्या. हरजस सिंगने ६४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली.

who is harjas singh u 19 world cup
who is harjas singh u 19 world cup (AFP)

India U19 vs Australia U19 Final : अंडर-१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये (११ फेब्रुवारी) टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यासह वर्षभरात आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे आणखी एक स्वप्न भंगले. अंडर १९ वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. 

गेल्या ८ महिन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताचा तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव केला आहे. यापूर्वीच्या दोन फायनलमध्येही (WTC आणि वनडे वर्ल्डकप) भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रविवारी (११ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतासमोर विजयासाठी २५४ धावांचे लक्ष्य होते. पण संपूर्ण संघ ४३.५ षटकात १७४ धावांवर गारद झाला.

चंदीगडच्या मुलाने टीम इंडियाकडून ट्रॉफी हिसकावली

अंडर १९ वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारतीय वंशाच्या हरजस सिंगने सर्वाधिक धावा केल्या. हरजस सिंगने ६४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. यानंतर, भारतीय वंशाच्या हरजस सिंगने टीम इंडियाकडून ट्रॉफी हिसकावून घेतल्याचे बोलले जात आहे.

हरजस सिंह कोण आहे?

पण तुम्हाला माहिती आहे का की हरजस सिंगचे भारताशी खास नाते आहे. वास्तविक, हरजस सिंगचे कुटुंब मूळचे चंदीगडचे आहे. हरजस सिंगचे कुटुंब २००० मध्ये सिडनीला गेले. हरजस सिंगचे वडील इंदरजीत सिंग हे पंजाबचे स्टेट बॉक्सिंग चॅम्पियन राहिले आहेत.

तर हरजस सिंगची आई अविंदर कौर या राज्यस्तरीय लांब उडी खेळाडू राहिल्या आहेत. आता हरजस सिंगने ऑस्ट्रेलियाला अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक जिंकण्यास मदत केली.

सामन्यानंतरचा, हरजस सिंगचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हरजस सिंग पारंपरिक कबड्डीच्या शैलीत विजय साजरा करताना दिसत आहे.  हरजस सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

तर चंदीगडच्या एका मुलाने टीम इंडियाकडून वर्ल्ड कपची ट्रॉफी हिसकावून घेतल्याचेही काही भारतीय चाहत्यांचे म्हणणे आहे. याशिवाय हरजस सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi