Ranji Trophy : धर्मेंद्र सिंह जडेजा कोण आहे? ज्यानं ऋषभ पंतची विकेट काढली, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : धर्मेंद्र सिंह जडेजा कोण आहे? ज्यानं ऋषभ पंतची विकेट काढली, वाचा

Ranji Trophy : धर्मेंद्र सिंह जडेजा कोण आहे? ज्यानं ऋषभ पंतची विकेट काढली, वाचा

Jan 23, 2025 09:17 PM IST

Who Is Dharmendrasinh Jadeja, Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये आजपासून दिल्ली आणि सौराष्ट्र आमनेसामने आहेत. हा सामना राजकोटमध्ये खेळला जात असून या सामन्यात सौराष्ट्राच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. सौराष्ट्रच्या धर्मेंद्रसिंग जडेजाने ३ बळी घेतले.

Ranji Trophy : धर्मेंद्र सिंह जडेजा कोण आहे? ज्यानं रवींद्र जडेजाच्या स्टाईलमध्ये ऋषभ पंतची विकेट काढली, वाचा
Ranji Trophy : धर्मेंद्र सिंह जडेजा कोण आहे? ज्यानं रवींद्र जडेजाच्या स्टाईलमध्ये ऋषभ पंतची विकेट काढली, वाचा

Ravindra Jadeja Dharmendrasinh Jadeja : रणजी ट्रॉफीमध्ये आजपासून (२३ जानेवारी)  दिल्ली आणि सौराष्ट्र आमनेसामने आहेत.  या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा दिल्लीकडून खेळत आहे. पंतने यापूर्वी शेवटचा रणजी सामना २०१७ मध्ये खेळला होता. 

दरम्यान, पंतचे रणजी ट्रॉफीतील पुनरागमन खूपच वाईट ठरले. पहिल्या डावात तो फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. १० चेंडूत एक धाव करून ऋषभ पंत बाद झाला. धर्मेंद्रसिंग जडेजाने त्याला प्रेरक मंकडकरवी झेलबाद केले. 

पहिल्या डावात धर्मेंद्रसिंग जडेजा याने शानदार गोलंदाजी करताना १९ षटकांत ६३ धावांत ३ बळी घेतले. पंतसोबतच धरमेंद्रसिंग जडेजाने सुमित माथूर आणि शिवम शर्मालाही बाद केले. 

धर्मेंद्र सिंह जडेजा कोण आहे?

३४ वर्षीय धर्मेंद्र सिंह जडेजा हा अनुभवी लेफ्ट आर्म स्पिनर आहे, जो सौराष्ट्रकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. धर्मेंद्रने आत्तापर्यंत ९० प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ३७५ विकेट्स आहेत. 

जडेजाने ८२ लिस्ट ए सामन्यात ११८ विकेट घेतल्या आहेत. टी-20 मध्येही त्याची कामगिरी दमदार आहे. धर्मेंद्रने ६९ टी-20 सामन्यांमध्ये ६.९१ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना ६१ विकेट घेतल्या आहेत.

दिल्ली आणि सौराष्ट्र सामन्यात आतापर्यंत काय घडलं?

दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिल्लीची फलंदाजी फारशी खास नव्हती. सौराष्ट्रने दिल्लीला ४९.४ षटकांत १८८ धावांत ऑलआउट केले. 

दिल्लीकडून आयुषने सर्वाधिक ६० धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय मयंक जितेंद्र गुसेनने ३८ धावा केल्या. 

तर सौराष्ट्राकडून टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याने ५ विकेट घेतल्या. तर धर्मेंद्रने ३ बळी घेतले. जयदेव उनाडकट आणि युवरसिंग दोधियाने १-१ विकेट घेतली.

यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्रने ५ विकेट्सवर १६३ धावा केल्या होत्या. सौराष्ट्रकडून हार्विक देसाईने ९३ धावा केल्या. रवींद्र जडेजा ३८ धावा करून बाद झाला. दिल्लीकडून शिवम शर्माने २ बळी घेतले. हर्ष त्यागी, आयुष बडोनी आणि अर्पित राणा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. सौराष्ट्र सध्या २५ धावांनी पुढे आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या