आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात फलंदाजाने एका षटकात ३९ धावा केल्या आहेत. सामोआ आणि वानुआटू या देशांमध्ये हा सामना खेळला गेला. यात सामोआच्या डॅरियस व्हिसर याने गोलंदाज नलिन निपिकोच्या ६ चेंडूत ३९ धावा फटकावल्या.
हा पराक्रम पुरुषांच्या ICC पुरुष T20 विश्वचषक उप-प्रादेशिक पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर-ए २०२४ या स्पर्धेमध्ये घडला.
सामोआचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरियस व्हिसर याने राजधानी अपिया येथे टी-20 विश्वचषक पूर्व आशिया पॅसिफिक क्षेत्र पात्रता स्पर्धेत वानुआतुविरुद्ध एका षटकात ३९ धावा करून चर्चा मिळवली.
वेगवान गोलंदाज नलिन निपिकोच्या एका षटकात विसरने ६ षटकार ठोकले. या षटकात ३ नो बॉलचाही समावेश होता, ज्यामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम झाला.
२८ वर्षीय डॅरियस व्हिसर याचा हा केवळ तिसरा टी-20 सामना होता. त्याने ६२ चेंडूत ५ चौकार आणि १४ षटकारांच्या मदतीने १३२ धावा केल्या.
यापूर्वी ५ वेळा गोलंदाजाने एका षटकात ३६ धावा दिल्या होत्या. या गोलंदाजांमध्ये स्टुअर्ट ब्रॉड (२००७), अकिला धनंजय (२०२१), करीम जन्नत (२०२४), कामरान खान (२०२४) आणि अजमतुल्ला ओमरझाई (२०२४) यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा डॅरियस व्हिसर हा डॅरियस व्हिसर पहिलाच फलंदाज आहे. त्याच्या खेळीनंतरही सामोआचा संघ १७४ धावांवर बाद झाला. कर्णधार कालेब जसमतच्या १६ धावा ही त्यांच्या संघासाठी व्हिसरनंतरची दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती.
वानुआतुच्या संघाने प्रत्युत्तरादाखल चांगले आव्हान सादर केले पण अखेरीस त्यांना ९ विकेट्सवर १६४ धावाच करता आल्या आणि १० धावांनी सामना गमावला.
डॅरियस व्हिसर याने यापूर्वी सेंट जॉर्ज जिल्हा आणि सिडनी विद्यापीठाकडून सिडनी ग्रेड क्रिकेट खेळले आहे. एका अहवालात दावा केला आहे की तो सिडनी विद्यापीठ आणि न्यूइंग्टन कॉलेजमध्ये क्रिकेट प्रशिक्षक देखील आहे. त्याच्या तिसऱ्या T20 सामन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक झळकावणारा तो पहिला सामोआ खेळाडू ठरला. व्हिसर याला सामोआचा क्राउन प्रिन्स देखील म्हटले जाते.