Corbin Bosch : आफ्रिकेचा नवा स्टार कॉर्बिन बॉश कोण आहे? डेब्यू सामन्यात गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवला दम, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Corbin Bosch : आफ्रिकेचा नवा स्टार कॉर्बिन बॉश कोण आहे? डेब्यू सामन्यात गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवला दम, पाहा

Corbin Bosch : आफ्रिकेचा नवा स्टार कॉर्बिन बॉश कोण आहे? डेब्यू सामन्यात गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवला दम, पाहा

Dec 27, 2024 09:21 PM IST

Who Is Corbin Bosch : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश याने स्वप्नवत कसोटी पदार्पण केले. गोलंदाजी करताना बॉशने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत इतिहास रचला. त्यानंतर फलंदाजी करताना त्याने ८१ धावा केल्या.

Corbin Bosch : आफ्रिकेचा नवा स्टार कॉर्बिन बॉश कोण आहे? डेब्यू सामन्यात गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवला दम, पाहा
Corbin Bosch : आफ्रिकेचा नवा स्टार कॉर्बिन बॉश कोण आहे? डेब्यू सामन्यात गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवला दम, पाहा

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात झाली. आज सामन्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशीच पाकिस्तान-आफ्रिका कसोटी सामना रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात अवघ्या २११ धावांत आटोपला.

आफ्रिकेकडून पदार्पणाचा सामना खेळणारा कॉर्बिन बॉश याने ४ विकेट घेतल्या, तर ३५ वर्षीय डेन पीटरसनने ५ विकेट्स घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.

दरम्यान, आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कॉर्बिन बॉश याने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही कमाल केली. तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ९३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. 

पदार्पणाच्या कसोटीत नवव्या क्रमांकावरील फलंदाजाने ८१ धावा करणे हा एक विक्रम आहे. अडचणीत असलेल्या आफ्रिकेला कॉर्बिन बॉशने ३०१ धावांपर्यंत नेले आणि आपल्या संघाला ९० धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. यापूर्वी त्याने गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती.

कॉर्बिन बॉश याने सेंच्युरियनमध्ये पाकिस्तानविरुद्ध स्वप्नवत कसोटी पदार्पण केले. या प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूने कसोटीतील पहिल्या चेंडूवर पहिला बळी मिळवला आणि त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद ८१ धावा केल्या. 

या ३० वर्षीय खेळाडूने २०१४ मध्ये टायटन्सकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ माजवणाऱ्या कॉर्बिन बॉशबद्दलच्या ५ रंजक गोष्टी जाणून घेऊया

१) वडील १९९२ मध्ये वनडे विश्वचषक खेळले आहेत

कॉर्बिन बॉश याचे दिवंगत वडील टर्टियस हे १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होते आणि ते देशातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक होते. तथापि, टर्टियसने स्पर्धेत दोन सामने खेळले आणि एकही विकेट घेतली नाही. यानंतर त्यांनी त्याच वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला आणि तीन विकेट्स घेतल्या. टर्टियस यांचा वयाच्या ३३ व्या वर्षी रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. त्यावेळी कॉर्बिन फक्त ५ वर्षांचा होता.

२) आईने आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटर बनवले

कॉर्बिनचा भाऊ एथन बॉश हा देखील व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. २०१० मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने २०३ विकेट्स घेतल्या असून २००० हून अधिक धावा केल्या आहेत. एथनच्या मते, वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने त्याला आणि त्याच्या भावाला व्यावसायिक क्रिकेटर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

३) एडन मार्करमसोबत अंडर-१९ विश्वचषक खेळला

कॉर्बिन बॉशने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्करामसह प्रिटोरिया बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. यानंतर त्याने मार्करामच्या नेतृत्वाखाली कागिसो रबाडासोबत २०१४ अंडर-१९ विश्वचषक खेळला. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात बॉशने १५ धावांत ४ विकेट घेतल्या होत्या.

४) संधीच्या शोधात ब्रिस्बेनला गेला

कॉर्बिन बॉश २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे चांगल्या क्रीडा संधींच्या शोधात गेला. तो नॉर्दर्न सबर्ब डिस्ट्रिक्ट्सकडून खेळण्यात यशस्वी झाला आणि त्याने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू अँडी बिचेल आणि फिल जॅक्ससोबत वेळ घालवला. पण २०१७ मध्ये तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेत परतला.

५) IPL २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता

आयपीएल २०२२ मध्ये, राजस्थान रॉयल्सने जखमी नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी कॉर्बिन बॉशचा संघात समावेश केला होता. तथापि, अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्यास असमर्थतेमुळे, RR ने त्याला २०२३ मध्ये रिलीज केले.

 

Whats_app_banner