Who Is Brydon Carse : काव्या मारन यांना स्वस्तात हिरा मिळाला, ब्रायडन कार्सने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Who Is Brydon Carse : काव्या मारन यांना स्वस्तात हिरा मिळाला, ब्रायडन कार्सने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम

Who Is Brydon Carse : काव्या मारन यांना स्वस्तात हिरा मिळाला, ब्रायडन कार्सने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम

Jan 26, 2025 02:05 PM IST

Who Is Brydon Carse : २९ वर्षीय ब्रायडन कार्स याने १८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १७ चेंडूत ३१ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. गोलंदाजीतही त्याने प्रावीण्य दाखवले. कार्सने ४ षटकात २९ धावांत ३ बळी घेतले.

Who Is Brydon Carse : काव्या मारन यांना स्वस्तात हिरा मिळाला, ब्रायडन कार्सने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम
Who Is Brydon Carse : काव्या मारन यांना स्वस्तात हिरा मिळाला, ब्रायडन कार्सने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवला दम (PTI)

Brydon Carse Sunrisers Hyderabad : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (२५ जानेवीर) एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. 

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हा सामना २ विकेट आणि ४ चेंडू राखून जिंकला. 

टीम इंडियाने आता मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र, चेन्नईत एका इंग्लिश खेळाडूने चमकदार कामगिरी केली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत त्याने जबरदस्त कामगिरी केली. या खेळाडूचे नाव ब्रायडन कार्स आहे.

 २९ वर्षीय ब्रायडन कार्स याने १८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १७ चेंडूत ३१ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. गोलंदाजीतही त्याने प्रावीण्य दाखवले. कार्सने ४ षटकात २९ धावांत ३ बळी घेतले.

IND vs ENG : रवी बिष्णोईचे दोन चौकार भारत विसरणार नाही, त्या १५ धावांमुळे सामना टीम इंडियाने जिंकला

दरम्यान, आता ब्रायडन कार्सच्या कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्य मारन या चांगल्याच खूश झाल्या असतील. कारण आयपीएल २०२५ साठीच्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ब्रेडन कार्स याला केवळ १ कोटी रुपयांना खरेदी केले होते. कार्सने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही.

काव्या मारन यांना स्वस्ताक हिरा मिळाला

ब्रायडन कार्स याने गोलंदाजीत आणि फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादला केवळ एक कोटी रुपयांमध्ये जबरदस्त खेळाडू मिळाला आहे.

 चेन्नईत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता ब्रायडन कार्सवर चाहत्यांची सतत नजर राहणार आहे. तो टीम इंडियाविरुद्धच्या आगामी सामन्यांमध्ये आणि त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये काय चमत्कार दाखवतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

ब्रायडन कार्स कोण आहे?

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या ब्रायडन कार्स याने २०२१  मध्ये इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर २०२३ मध्ये टी20 आणि २०२४ मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. 

आतापर्यंत त्याने इंग्लंडकडून ५ कसोटी, १९ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात २३ आणि टी-20 मध्ये ९ विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेडन कार्स याची देशांतर्गत कारकीर्द

ब्रायडन कार्सने आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत ५३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १५४ विकेट घेतल्या आहेत. त्याने २८ लिस्ट ए आणि ७९ टी-20 सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे ३३ आणि ४७ विकेट आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या