भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी (१९ सप्टेंबर) चेन्नईत खेळवली जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाचा हा निर्णय डावाच्या पहिल्या काही षटकांमध्ये अगदी योग्य असल्याचे दिसून आले. कारण बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूद याने भारताला पहिले ४ धक्के दिले.
हे वृत्त लिहेपर्यंत हसन महमूद याने रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना बाद केले होते. ढगाळ वातावरणात नवीन चेंडूवर स्विंग मिळवणाऱ्या हसन महमूदने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला.
हसन महमूद हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे, तो बांगलादेशसाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. २०२० मध्ये त्याने बांगलादेशकडून ची-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये हसन महमदूला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने सातत्याने व्हाईट बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०२४ मध्ये त्याचे नशीब उजळले आणि त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.
हसन महमूदने एप्रिल २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. यानंतर हसन महमूदला पाकिस्तान दौऱ्याची संधी मिळाली. आता तो भारताविरुद्ध कारकिर्दीतील केवळ चौथी कसोटी खेळत आहे. वनडे आणि टी-20 प्रमाणे त्याने कसोटी क्रिकेटमध्येही चमत्कार करायला सुरुवात केली.
हसन महमूदने आतापर्यंत ३ कसोटी, २२ एकदिवसीय आणि १८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या ६ डावात २५ च्या सरासरीने १४ बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने कसोटीच्या २१ डावांमध्ये ३२.१० च्या सरासरीने ३० विकेट्स घेतल्या आहेत.
उर्वरित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २५.७७ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत. हसन त्याच्या अचूकतेसाठी प्रसिद्ध आहे. जुन्या चेंडूबरोबरच नवीन चेंडूवरही स्विंगने चमत्कार करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.