Team India Squad Announced for England Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. दरम्यान, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने १७ सदस्यीय संघ निवडला आहे. यात विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नाही. वैयक्तिक कारणांमुळे विराट निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
यानंतर वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी २७ वर्षांच्या आकाश दीप या नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. आकाशदीप वेगवान गोलंदाज आहे. आकाश दीप इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित ३ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो.
२७ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या तीन सामन्यात १३ विकेट घेतल्या होत्या. बिहारमध्ये जन्मलेला आकाश दीप बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आकाशने २९ प्रथम श्रेणी सामन्यात १०३ बळी घेतले आहेत. तसेच, आकाशदीप आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.
आकाश दीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेष भारत आणि बंगालचे प्रतिनिधित्व केले आहे. सोबतच आकाश दीपने २८ लिस्ट-ए सामने खेळले आहेत. आकाश दीपने लिस्ट-ए सामन्यांमध्ये ४२ बळी घेतले आहेत. याशिवाय ४१ टी-20 सामन्यांमध्ये त्याने ४८ विरोधी फलंदाजांना आपला बळी बनवले आहे.
अलीकडेच आकाश दीप इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना दिसला होता. आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या ३ सामन्यात १३ विकेट घेतल्या. मात्र, आता आकाश दीप इंग्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
संबंधित बातम्या