मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका… सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाविरूद्ध? जाणून घ्या

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका… सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाविरूद्ध? जाणून घ्या

Jun 24, 2024 05:18 PM IST

T20 World Cup 2024 Semi Final : भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर त्यांचा सामना कोणत्या संघाशी होईल? हे आपण येथे जाणून घ्या.

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका… सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाविरूद्ध? जाणून घ्या
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका… सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाविरूद्ध? जाणून घ्या (AFP)

टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये सध्या सुपर ८ फेरीतील सामने सुरू आहेत. सुपर-८ च्या ब गटातून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मात्र अ गटातील उपांत्य फेरीतील संघ अद्याप समोर आलेले नाही. भारत सध्या अ गटात अव्वल स्थानावर आहे, पण या गटातील सर्व संघांना उपांत्य फेरीत जाण्याची अजूनही संधी आहे.

दरम्यान, अ गटातून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण त्यांचे ४ गुण आहेत आणि नेट रन-रेट +२.४२५ आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीत गेल्यास भारताचा सामना कोणत्या संघाशी होऊ शकतो हे जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाविरूद्ध?

टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या वेळापत्रकानुसार, सुपर-८ च्या अ गटातील पहिल्या संघाचा सामना ब गटातील दुसऱ्या संघाशी होईल. तर ब गटातील अव्वल संघाचा सामना अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.

भारत-इंग्लंड सेमी फायनल रंगणार?

सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरली तरी ते कदाचित अव्वल स्थानावरच राहतील. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान जास्तीत जास्त ४ गुण मिळवू शकतात, परंतु भारताच्या नेट रनरेटच्या पलीकडे जाणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.

याचा अर्थ, जर भारत अ गटात अव्वल राहिला तर त्यांचा सामना ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशई होईल. इंग्लंड ब गटात दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच, सेमी फायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला भिडू शकते.

जर टीम इंडिया अ गटात दुसऱ्या स्थानावर घसरली तर त्यांचा सामना ब गटातील अव्वल संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होईल.

इंग्लंड गतविजेता

२०२२ मध्ये इंग्लंडने टी-20 विश्वचषक जिंकला होता. गतविजेतेपदाचे दडपण असतानाही इंग्लंडने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात यूएसएचा १० गडी राखून पराभव केल्यावर जोस बटलर आणि त्याचे खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले असतील. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला तर टीम इंडियाला विजयाची नोंद करणे सोपे जाणार नाही.

WhatsApp channel